সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, February 19, 2018

एक मोदी पैसा जमा करतो दुसरा मोदी तो पळवितो:रामदेव बाबा

चंद्रपूर(ललित लांजेवार): 
एक मोदी पैसा बँकेत जमा करतो आहे. आणि दुसरा मोदी जमा केलेला पैसा पळवितो आहे अशी स्तुतीसुमन बोल रामदेव बाबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल चंद्रपुरात बोलतांना म्हणाले .
काळे धन कमविणाऱ्यावर कारवाई करणे हि जबाबदारी सरकारची आहे,आणि सरकार याविरोधात कारवाई करत आली आहे. देशाला ११५०० कोटीचा फटका देत परदेशात पसार झालेल्या निरव मोदी बद्दल रामदेव बाबा बोलतांना म्हणाले एक मोदी पैसा बँकेत जमा करतो आहे आणि दुसरा मोदी जमा केलेला पैसा पळवितो आहे.अश्या पैसे पळवून घेऊन जाणारे एक प्रकारचे देशद्रोही आहे, मी फक्त एकाच मोदीला ओळखतो, ते म्हणजे नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदींच्या व्यतिरिक्त जे पण मोदी आहेत जे, घोटाळे करतात त्यांच्यामुळे देशाचे नाव खराब होते. नीरव मोदीला त्याच्या पापाचे फळ मिळेल. मोदी सरकार त्याला त्याच्या योग्य जागी धाडेल, असा विश्वास योग गुरु रामदेव बाबांनी व्यक्त केला.
तर आतापरीयंत विदेशात लपविलेला काळा पैसा देशात परत आणायचे माझे प्रयत्न सुरु आहे असे मत योगगुरू रामदेव बाबा यांनी चंद्रपूर येथील श्रमिक पत्रकार भवनात आयोजीत पत्रपरिषदेत बोलतांना म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे राज्याचे अर्थ, नियोजन, वने मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून २० ते २२ पर्यंत नि:शुल्क योग चिकित्सा व ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त योगगुरु रामदेवबाबा चंद्रपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.याप्रसंगी सुधीर मुनगंटीवारही उपस्थित होते.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद काकड़े,कोषाध्यक्ष- मजहर अली जिल्हापरिषद अध्यक्ष देवराव भोन्गडे आदी उपस्थित होते. 

 योगा केल्याने अच्छे दिन येऊ शकतात, नेहरू देखील योग करायचे ,सोनिया गांधी,राहुल गांधी,हे सर्व योग करतात योगा केल्याने अच्छे दिन येऊ शकतात असा टोला देत रामदेव बाबा यांनी गाधीं परिवाराची खिल्ली उडविली. तर ते पुढे बोलतांना म्हणाले पंतप्रधान पद हे देशाचे महत्त्वाचे पद आहे. या पदाची विश्वासार्हता जोपासण्यासाठी हे पद लोकपालच्या कक्षेत आणू नये, समाजसेवक अण्णा हजारे यांचे वय आता वाढलेले आहेत मात्र ते भ्रष्टाचार विरोधात आंदोलनाच्या तयारीत लागले आहे. जर देशाचा कारभारच पारदर्शक असेल, तर आंदोलन करण्यात अर्थ काय? अश्या अन्ना हजारेंच्या आंदोलनाचा फायदा राजकीय मंडळी घेतात. या सर्वातून जेव्हा हजारे बाहेर पडतील तेव्हाच त्यांच्यासोबत राहीन, असेही रामदेवबाबा म्हणाले.
रामदेव बाबांनी मुनगंटीवारांची थोपटली पाठ 

मी गेल्या १० वर्षा आधी चंद्रपूर येथे योग शिबिराविषयी कार्यक्रासाठी आलो होतो तेव्हाही भव्यदिव्य आयोजन हे मुनगंटीवार यांनी केले होते.मुनगंटीवार हे हुशार व चलाख राजकारणी असून गेल्या २५ वर्षांपासून सत्तेत किव्हा सत्तेच्या बाहेर राहून राजकारणात विजय प्राप्त केले आहे. सुधीर मुनगंटीवार हे जनतेच्या मनात दिवसेंदिवस राज करीत आहेत. राजकारणात राहुन जनतेसाठी आरोग्य, व्यसनमुक्ती ,शिक्षण आणि अनेक बाबींसाठी ते झटत आहेत. सर्वांना झिरो टक्के बजेटमध्ये आरोग्य लाभावे, अशी त्यांची संकल्पना आहे. आणि म्हणूनच त्यांच्या पुढाकारातून मूल येथे तीन दिवसीय योगचिकित्सा व ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचेही रामदेवबाबा यावेळी म्हणाले. 




শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.