সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, February 28, 2018

गार्गी सिंग, गुंजन शर्मा, अनिकेत बारई चित्रकला स्पर्धेत प्रथम

  • चिल्ड्रेन ट्राफिक पार्कचा वर्धापन दिन सोहळा : 
  • सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
नागपूर,ता.२८ : ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार चिल्ड्रेन ट्राफिक पार्कच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (ता. २७) आयोजित चित्रकला स्पर्धेत पहिली ते चवथीच्या गटात बिशप कॉटनची विद्यार्थिनी गार्गी सिंग, पाचवी ते सहावीच्या गटात वाल्मिकीनगर हिंदी शाळेची विद्यार्थिनी गुंज़न शर्मा, तर आठवी ते नववीच्या गटात लालबहादूर शास्त्री विद्यालयाचा अनिकेत बारई यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

पहिल्या गटात द्वितीय क्रमांक भारत प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी खुशबू क्षिरसागर, तृतीय क्रमांक सरस्वती विद्यालयाचा केविन थॉमसने पटकाविला. लिटल स्टारचा विद्यार्थी वेयन सातपुते, सांदीपनीचा श्रीराम यादव यांनी उत्तेजनार्थ पुरस्कार पटकाविला. दुसऱ्या गटात द्वितीय वाल्मिकीनगर हिंदी हायस्कूलची मयुरी निशाद तर तृतीय बॅ. शेषराव वानखेडे विद्यानिकेतनची श्रावणी शेराम, उत्तेजनार्थ सुरेंद्रगढ शाळेची पोर्णिमा द्विवेदी आणि हडसची विद्यार्थिनी भूमी जोशी हिने प्राप्त केला. तिसऱ्या गटात द्वितीय क्रमांक वाल्मिकीनगर हिंदी स्कूलची कीर्ति शर्मा, तृतीय दत्तात्रय नगर शाळेचा विद्यार्थी अभिषेक अंकुश तर उत्तेजनार्थ पुरस्कार सुरेंद्रगढ हायस्कूलचा आशीष उपाध्याय, आझाद नगर उर्दू शाळेचा विद्यार्थी नाहीद परवीन ह्याने पटकाविला.

सर्व विजेत्यांना ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार चिल्ड्रेन ट्राफिक पार्कमध्ये सायंकाळी आयोजित रंगारंग कार्यक्रमादरम्यान बक्षिसे देण्यात आली. बक्षिस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले, महिला व बालकल्याण सभापती वर्षा ठाकरे, धरमपेठ झोन सभापती रूपा राय, नगरसेवक सुनील हिरणवार, अमर बागडे, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, प्रगती पाटील, भाजपा महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष कीर्तिदा अजमेरा, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, भाजपचे प्रभाग अध्यक्ष अमर पारधी उपस्थित होते.

यावेळी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी उपस्थितांना देण्यात आली. देशभक्तीपर नृत्य, सामाजिक संदेश देणारे नृत्य, स्कीट, बेटी बचाओ वर लहानग्यांचे भाषण सादर करण्यात आले. नूतन भारत विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ स्कीटने उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या. यावेळी सर्व बालकलावंतांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रीन व्हिजीलच्या सदस्य सुरभी जैस्वाल यांचा नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्याबद्दल मान्यवरांनी सुरभी जैस्वाल तसेच ग्रीन व्हिजीलचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांचाही सत्कार केला. धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय यांनी त्यांच्या कार्याचा आपल्या भाषणातून गौरव केला. चित्रकला स्पर्धेचे परिक्षण बिना ठक्कर, ऐश्वर्या नरसिंगकर यांनी केले.

यावेळी मनपातील विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेवक किशोर जिचकार यांच्यासह शीतल पाटील, संगीता दंडिके, मनोज हिरणवार, स्मृति राघव, प्रतिभा अनिवार, सुनीता पाटील, शगुना उगरेले, ज्योत्स्ना हिरणवार, बच्चू पांडे, अरविंद सेलोकर, विलास मंडाले उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.