चंद्रपूर/प्रतिनिधी:
पहिले जटपूरा गेटवर होत असलेली वाहतुकीची कोंडी सोडवा नंतर सौंदर्यीकरण करा या मागणी करीता जटपूरा गेट येथे किशोर जोरगेवार यांच्या तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. सध्या चंद्रपुरात नको त्या कामावर पैश्याची उधडपट्टी करण्याचे काम सुरु असून जनतेच्या मुळ समस्या जैसे थे आहेत. त्यामूळे चंद्रपूरकरांना नाहक समस्यांना समोर जावे लागत असून जनतेमध्ये सत्ताधा-यांविषयी तिव्र रोष आहे. यातच जटपुरा गेटची वाहतूक कोंडी सोडविण्यापेक्षा या ठिकाणी दोन कोटीहून अधिक खर्च करुन सौंदर्यीकरनाचे वेड लोकप्रतिनीधींना लागले आहे. ही जनतेच्या संयमतेची थट्टा असून हा प्रकार आता आम्ही चालू देणार नाही. जो पर्यंत येथील वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविल्या जात नाही तोवर या ठिकाणी सौंदर्यीकरणाचे काम करु देणार नाही असा सक्त ईशारा सोमवारी किशोर जोरगेवार यांनी दिला आहे.
या धरणे आंदोलन आंदोलनाचे संचालन इरफान शेख यांनी केले, यावेळी माजी जिल्हा प्रमुख दिलीप कपूर, दीपक बेले, शहर प्रमुख सुरेश पचारे, जिल्हाप्रमुख भारती दुधानी, माजी नगरसेवक आकाश साखरकर, राजेश नायडू, वंदना हातगावकर, अमोल शेंडे, नगरसेवक विशाल निंबाळकर, कलाकार मल्लारप, संदीप कष्टी, अब्बासभाई, इरफान शेख, अजय कोंडलेवार, चिराग नथवानी, प्रकाश चंदनखेडे, चंद्रराज बाथो, विलास वनकर, दीपक पद्म्गीरीवार, रुपेश पांडे, विनोद अनंतवार, मुन्ना जोगी, शंकर दंतुलवार, राशीद हुसैन, दिलीप बेन्डले, वैभव माकडे, गौरव जोरगेवार,टिकाराम गावंडे, बबलु पुण्यवर्धन, मंगेश अहिरकर, बादल हजारे, मुकेश डाखोरे, राजेश मांगुळकर, प्रीतम लोणकर, माला तुरारे, सुजाता बल्ली, महादेव अडबाले, राहुल मोहुर्ले, अरुण येणप्रेद्दीवार, अशपाक खान, इरफान शेख, रवी करमरकर आदिंची उपस्थिती होती.