সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, February 17, 2018

१७७ योजनांचा वीज पुरवठा खंडित

मनपा ,नगर पालिकेची थकबाकी नगण्य
नागपूर - वारंवार लेखी सूचना देऊनही याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागपूर परिमंडळातील १७७ पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करीत महावितरणने दणका दिला आहे. यात नागपूर जिल्ह्यातील १५२ सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांचा तर वर्धा जिल्ह्यातील २५ सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांचा समावेश आहे.
वीज पुरवठा खंडित करण्यात आलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांकडे ३ कोटी ५४ लाख रुपयांची थकबाकी आहे. एकट्या काटोल विभागात ७७ सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांनी महावितरणचे अडीच कोटी रुपये थकवले आहेत.
महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी मागील आठवड्यात राज्यातील सर्व मुख्य अभियंत्याशी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सवांद साधून सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेत थकबाकीदार असल्येल्या वीज ग्राहकांची वीज जोडणी तात्काळ तोडण्याचे आदेश दिले होते. यानुसार राज्यभर थकबाकीदार वीज ग्राहकांच्या विरोधात महावितरणकडून जोरदार आघाडी उघडण्यात आली आहे.
            ग्राम पंचायतीच्या हद्दीत असल्येला पाणी पुरवठा योजनाची थकबाकी वाढली असताना नागपूर महानगर पालिका आणि अन्य नगर परिषेदेची थकबाकी अगदी नगण्य आहे. महावितरणच्या नागपूर परिमंडळात येणाऱ्या वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात एकुण ३४०० सार्वजनिक पाणी पुरवठा योजना सुरु आहेत. यातील   १९१५ सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांनी महावितरणचे २२ कोटी  ३ लाख रुपये थकवले आहेत. अनेक सार्वजिनक पाणी पुरवठा योजनांनी सप्टेंबर-२०१७ पासून वीज देयकाचे पैसे महावितरणकडे जमा केलेले नाहीत. थकबाकीची रक्कम भरावी म्हणून महावितरणकडून वारंवार पाठपुरावा करण्यात आल्यावर दाद न दिल्याने अखेर महावितरणला टोकाचे पाऊल उचलत वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई करावी लागली.नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी विभागात २३ योजनांकडे ३३ लाख १४ हजार रुपये ,नागपूर ग्रामीण विभाग-१ मधील ४० योजनांकडे ३२ लाख ९१ हजार रुपये, सावनेर विभागात १२ योजनांकडे १६ लाख ३१ हजार रुपये, मौदा विभागात ६ योजनांकडे २ लाख २० हजार रुपये, वर्धा जिल्ह्यातील आर्वी आणि हिंगणघाट विभागात प्रत्येकी १० योजनांकडे अनुक्रमे १३ लोक ४६ हजार रुपये आणि १३ लाख ५४ हजार रुपयांची थकबाकी आहे. वर्धा विभागात ५ योजनांकडे ३ लोक २९ हजर रुपयांची  थकबाकी आहे. महावितरणकडून थकबाकीदार सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांना वीज खंडित करण्याची नोटीस मिळताच १२५ ग्राहकांनी थकीत रकमेचा भरणा केला आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.