সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, February 24, 2018

मेट्रोच्या अत्यावश्यक कामांमुळे काही भागात आज वीज नाही

नागपूर दि. 24 फ़ेब्रुवारी
नागपूर मेट्रोला करावयाच्या अत्यावश्यक कामांमुळे महावितरणतर्फ़े रविवार दि. 25 फ़ेब्रुवारी 2018 रोजी कॉग्रेसनगर विभागांतर्गत असलेल्या शनि मंदीर, कुंभारटोली, विद्यापीठ परिसर, अंबाझरी, झिरो माईल, शासकीय मुद्रणालय आणि त्यासभोवतालच्या परिसरातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महावितरणतफ़े देण्यात आली आहे.
मेट्रोच्या कामांमुळे रविवारी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत 11 केव्ही आनंद टॉकीज वाहिनीवरील शनि मंदीर, हरदेव हॉटेल, कुंभारटोली, तेलीपुरा, कोष्टीपुरा या भागात याशिवाय 11 केव्ही शंकर नगर (विद्यापीठ परिसर) या वाहिनीवरील विद्यापीठ परिसर, रीद्धी-सिद्धी अपार्टमेंट, हिल टॉवर, माऊंट कॅसल, अंबाझरी उद्यान, देवतळे लेआऊट, वर्मा लेआऊट, उत्तर अंबाझरी मार्ग, पांढराबोडीचा काही भाग आणि अंबाझरी टेकडी या भागात तर सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत 11 केव्ही झिरो माईल वाहीनीवरील सीटीओ कंपाउंड, बीएसएनएल कार्यालय आणि शासकीय मुद्रणालय या भागातील वीजपुरवठा बंद राहील
महावितरणतर्फ़े दर बुधवारी देखभाल व दुरुस्तीमुळे काही भागांचा वीज पुरवठा ग्राहकांना पुर्वसुचना दिल्यानंतर बंद ठेवण्यात येतो, मात्र बुधवार दि दि, 21 फ़ेब्रुवारी पासून इयत्ता बारावीची परिक्षा सुरु झाल्याने परिक्षार्थ्यांना याचा त्रास होऊ नये याकरिता महावितरणने नियोजीत देखभाल व दुरुस्तीचे काम पुढे ढकलले आहे. यादरम्यान नागपूर मेट्रोला अत्यंत महत्वाच्या कामासाठी काही भागातील वीजपुरवठा बंद करण्याची आवश्यक्यता असल्याने महावितरणने त्याअनुषंगाने रविवारी वीज पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या या भागातील वीज ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून पुर्वसुचनाही देण्यात येईल, ग्राहकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.