नागपूर दि. 28 फेब्रुवारी 2018
अॅनालॉग टेरिस्ट्रीअल टी. व्ही. ट्रान्समिशनच्या डीडी नॅशनल चॅनेल व प्रादेशिक वाहिनीच्या अंतर्गत आर्वी (चॅनेल-11), पुलगाव (चॅनेल-27) तसेच वर्धा (चॅनेल-31) व भंडारा (चॅनेल-11) या दूरदर्शन रिले केंद्रांचे प्रसारण दिनांक 12 मार्चच्या मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार असून संबंधित केंद्राची सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार नाही.
दूरदर्शन डीडी फ्री डिश डी.टी.एच ( डिरेक्ट टू होम) सेवा यावर सदर चॅनेल इतरही चॅनेल्ससोबत उपलब्ध आहेत. यासाठी आवश्यक असलेली उपकरणे उदा. सेट टॉप बॉक्स, डिश अॅन्टीना आणि अन्य उपकरणे स्थानिक बाजारात उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी जवळच्या दूरदर्शन कार्यालय किंवा दूरदर्शनच्या www.ddindia.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. असे आवाहन दूरदर्शन अनुरक्षण केंद्र, नागपूरच्या अभियांत्रिकी विभागाचे संचालक श्री.अधीर गडपाले यांनी नागरिकांना केले आहे.