ब्रम्हपुरी तालुक्यातील कोथुळना नवेगाव येथील शेतकरी प्रविण वामन ठाकुर वय 36 वर्ष यांनी 21फरवरीच्या पहाटे सकाळी 04 वाजताच्या सुमारास उटुन सकाळी डब्बल फसल धानरोवनी करीता मोटार पंपाचे पाणी लावण्यासाठी जातो असे घरच्या कुटुंबीयांना सांगून गावालगत असलेले अरविंद नाकतोडे यांच्या शेताशिवात असलेल्या कडु लिंबू च्या झाडाला गळफास लावून आत्महत्या करुन आपली जिवन याञा संपवली ही घटना बुधवारी सकाळी 07:00 वाजताच्या सुमारास येथील शेतमजुर शेतात काम करण्याकरिता गेला असता समोर आली.
मृतक शेतकरी प्रविण वामन ठाकुर याला अडीच एकर शेती असुन त्यावर सेवा सहकारी संस्था मधुन 40 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते,व श्तातील पिकांवर मावा,अळी, तूळतुळा रोगांनी शेतात नापिकी झाली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी प्रविण वामन ठाकुर हा आर्थिक विवंचनेत दिसत होता.मुत्यक शेतकरी प्रविण वामन ठाकुर यांच्या पाठीमागे आई,पत्नी,एक मुलगी,एक मुलगा,एक भाऊ असा बराच मोठा आपत्य परीवार आहे.सदर मुत्यक शेतकरी प्रविण वामन ठाकुर यांनी गळफास लावून आत्महत्या केल्या ने कोथुळना नवेगाव येथील जनतेत शोककळा पसरली आहे.शासनाकडून सदर पिढीत कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात याव्ही अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद झोडगे,गोविंदराव भेंडारकर,ड्रा .प्रेमलाल मेश्राम विनोद राऊत यांनी भेट देऊन पोलीस निरीक्षक चव्हाण तहसीलदार चव्हाण साहेब यांना फोन केले व पंचनामा करून त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी अशी विनंती केली.
महाराष्ट्र शासनाने जरी कर्ज माफी केली असली तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्तेवर उपाययोजना सुचविल्या नसल्याने विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्म्हत्तेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे, यात मात्रालायातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या असोत व शेतकऱ्यांनी शेतीसाठी केलेली आत्महत्या असो हे आत्मह्तेचे प्रकरण सरकारच्या भविष्यात चांगलाच जिव्हारी लागू शकते,त्यामुळे आणखी शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने लवकरात लवकर उपाययोजना व सूचना करणे गरजेचे झाले आहे.