সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, February 08, 2018

वेळेत न येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांची दवाखान्याला आकस्मिक भेट

नागपूर,ता.८ : दवाखान्याची वेळ उलटून गेल्यावरदेखील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित न राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आला आहे. एनयुएचएमच्यासाहाय्याने मनपातर्फे शहरात चालविण्यात येणाऱ्या दवाखान्यांना वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती यांनी गुरूवार (ता.८) आकस्मिकपणे भेट दिली. त्यावेळी सदर नोटीस बजावण्यात आले.

नागपूर महानगरपालिका टाटा ट्रस्टच्या साहाय्याने शहरातील दवाखान्यांना अत्याधुनिक करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा सामंजस्य करारदेखील झाला आहे. त्यादृष्टीने आढावा घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दवाखान्याची स्थिती, कर्मचाऱ्यांचे कामांवरील दुर्लक्ष बघून नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासमवेत वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, आरोग्य विभागातील नीलेश बांबरे उपस्थित होते.

सर्वप्रथम सभापती चापले यांनी इंदोरा चौकातील बेझनबाग येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. तेथील वैद्यकीय अधिकारी व इतर चार कर्मचारी अनुपस्थित असल्याने त्यांच्या उपस्थित पटावर अनुपस्थित हा शेरा लावण्याचे, याचसोबतच त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे निर्देश सभापती मनोज चापले यांनी दिले. यानंतर असा प्रकार आढळल्यास कारवाई करण्यात येईल,असा इशारा सभापती चापले यांनी दिला.

त्यानंतर जयताळा येथील एनयुएचएमच्या दवाखान्याला मान्यवरांनी भेट दिली. तेथे देखील असाच प्रकार आढळला. तेथील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी अनुपस्थित असल्याने सभापती चापले यांनी संताप व्यक्त केला. या दवाखान्याची दुरूस्ती करण्यासंदर्भातील आढावा सभापती मनोज चापले यांनी घेतला. फुटाळा येथील दवाखान्याला मान्यवरांनी भेट दिली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.