সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, February 06, 2018

नव्या भारताच्या निर्मितीसाठी संस्कृत शिकणे अनिवार्य - डाॅ. श्रीनिवास वरखेडी


रामटेक- कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक येथील मुख्यालयाला आज मंगळवार, दि. 6 फेबु्रवारी 2018 रोजी नागपूरस्थित सी.पी.अॅंड बेरार महाविद्यालय, महाल येथील विद्याथ्र्यानी शैक्षणिक भेट दिली. महाविद्यालयाच्या संस्कृत विभाग प्रमुख डाॅ. विभा क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ही भेट देण्यात आली. या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विद्याथ्र्यांचे स्वागत आणि विश्वविद्यालयाची स्थापना, इतिहास, अभ्यासक्रम, विविध सुविधा इ. ची माहिती जनसंपर्क अधिकारी डाॅ. रेणुका बोकारे यांनी दिली.याप्रसंगी कुलगुरू डाॅ. श्रीनिवास वरखेडी यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. आपल्या संबोधनात डाॅ. वरखेडी म्हणाले, ‘‘कोणत्याही भाषेचा मूळ स्रोत ही संस्कृत भाषा आहे. भारताचे भविष्य हे युवकांच्या हातात आहे आणि म्हणूनच भारताच्या युवा पिढीने आपला इतिहास जाणून घेण्यासाठी आणि आधुनिक युगातील संगणकासाठी सर्वाधिक अचूक असा गौरव प्राप्त करणारी संस्कृत भाषा शिकणे अनिवार्य आहे. भारताच्या भविष्यासाठी आणि नवनिर्मितीसाठी ते आवश्यक आहे. प्राचीन परंपरा आणि आधुनिकता यांचा अपूर्व संगम संस्कृत भाषेत असल्याने संस्कृत भाषेला देवालयापुरते मर्यादित न करता तिला प्रयोगशाळेत अभ्यासले गेले पाहिजे. आज कोणताही नवीन शब्द निर्माण करायचा असल्यास संस्कृत धातूंच्याद्वारेच तो तयार करता येतो, ही शब्द घडविण्याची क्षमता हे संस्कृत भाषेचे अनन्यसाधारण सामथ्र्य आहे.’’ यावेळी विद्याथ्र्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना मा. कुलगुरूंनी समयोचित उत्तरे दिली.
ग्रंथपाल डाॅ. दीपक कापडे यांनी ग्रंथालयाची आणि स्पर्धा परीक्षा केंद्राची तसेच कविकुलगुरू कालिदास अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. ऋषिकेश दलई यांनी बी.एड्., एम्. एड्. अभ्यासक्रमांची माहिती दिली. डाॅ. विभा क्षीरसागर यांनी आभार मानले. विद्याथ्र्याना अल्पाहार देण्यात आला. विद्याथ्र्यांनी रामटेक येथील प्रशासकीय भवन, ग्रंथालय, विश्वविद्यालय परिसराची पाहणी करून आनंद व्यक्त केला. प्रा. सुनीता पांडे, डाॅ. डोंगरवार, प्रा. स्वाती नवघरे हे प्राध्यापक याप्रसंगी उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.