गेल्या महिना भरापासून माकडांनी चंद्रपुरात हदौस घातला आहे. या माकडांनी अनेकांच्या घरावर धुमाकूळ घालून झाडांचे नुकसान केले. तसेच वाहनांची तोडफोड केली. या प्रकारामुळे चंद्रपूरकरांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.शहतील कृष्ण नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून "वानरसेना" मोठ्या संख्येने येत असून सकाळी सकाळी नागरिकात दह्षद निर्माण करत आहेत. मात्र यावरील उपाययोजनेसाठी वनविभाग मात्र सुस्त असल्याने वनविभागाप्रती संताप व्यक्त केला जात आहे.
पूर्वी माकडे वस्तीत यायची व कालांतराने जंगलात निघुन जायची. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्यांचा त्रास होत नव्हता. परंतु अलिकडे गेल्या महिनाभरापासून माकडांनी परिसरातील नागरिकांचे घरे, सार्वजनिक वृक्ष, रस्ता, यावर आपले बस्तान मांडले असल्याने सकाळी नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होत आहे.
विशेष म्हणजे हा परिसराला लागून जंगल असल्याने या परिसरात माकडांचा जास्तच त्रास होत असल्याची तक्रार वार्ड वासी करत आहे. सकाळी १५ ते २० माकडांचा ताफा हा सकाळी कृष्ण नगर परिसरात दहषद निर्माण करून नागरिकांना घाबरविण्याचा प्रयत्न करत आहे.
