সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, February 05, 2018

दारू तस्करीसाठी कापसाचा आधार

घोडपेठ/प्रतीनिधी:
जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, याच काळात अवैध दारूची वाहतूक करण्यासाठी तस्करांकडून विविध प्रकारचे शोध लावण्यात आल्याचे समोर आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर असल्याने वाहनाने कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांची सध्या लगबग सुरू आहे. मात्र याचा फायदा घेत कापसाच्या आड दारूतस्करीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पडोली पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. दारूतस्करी करण्यासाठी वापरण्यात आलेली ही शक्कल पाहून पोलिसांसह अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला.
पडोली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आर. के. सिंगनजुडे शनिवारी रात्री गस्तीवर असताना गुप्त सुत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चंद्रपूर-नागपूर महामार्गावर सापळा रचून दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली. दरम्यान, रात्री १०.३० वाजताच्या सुमारास नागपूरकडून चंद्रपूरकडे येणाऱ्या अशोक लेलॅन्ड कंपनीच्या पिकअप वाहनाला पोलिसांनी थांबविले. पिकअप वाहनाची (क्रमांक एमएच ३१ ईएन ०८६९) झडती घेतली असता कापसाची पीक आढळून आले. आणखी खोलात तपासणी केली असता कापसामध्ये ११५ खर्ड्यांच्या खोक्यात प्रत्येकी ९० मिलीच्या ११ हजार ५०० देशी दारूच्या बॉटल्स आढळून आल्या. संपूर्ण दारू, ५० किलो कापूस व दोन मोबाइल, असा ११ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आणि दारू तस्क़रीकरिता वापरलेले वाहन, असा एकूण १४ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर प्रकरणाची पोलीस स्टेशन पडोली येथे नोंद करण्यात आली असून आरोपी विनोद तुकाराम आडे व मुन्ना आनंदराव कांबळे दोन्ही रा. वर्धा यांना अटक करण्यात आलेली आहे.Cotton base for smuggling | तस्करीसाठी कापसाचा आधार

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.