चंद्रपूर/प्रतिनिधी:
माळी समाज हा परीश्रम घेणारा आहे. निर्मिती करणे हा या समाजाचा स्थायीभाव आहे. मेहनतीतून कार्य करून आपले उत्कर्ष साधणारा हा समाज इतरांपुढे आदर्श ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्राीबाई यांचा आदर्श डोळद्घासमोर ठेवून या समाजाने विविधांगी क्षेत्रास गवसणी घातली आहे. समाजाची आणखी प्रगती करण्यासाठी समाजातील ज्ञानवंतानी समाजाच्या उत्कर्षासासाठी झटावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज आहीर यांनी केले.
स्थानिक महात्मा ज्योतीबा फुले सांस्कृतिक सभागृहात क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळ व अखिल भारतीय माळी समाज महासंघाच्या संयुक्त विद्यमाने सर्वशाखीय माळी समाज उपवर-उपवधू परिचय मेळावा रविवारी पार पडला. या मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ. नाना श्यामकुळे, माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अविनाश ठाकरे, क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष विजय राऊत, जि.प.च्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख किशोर जोरगेवार, जि.प.चे समाज कल्याण सभापती ब्रिजभुषण पाझारे, महाराष्ट्र माळी महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष अरूण तिखे, मंडळाचे माजी अध्यक्ष बबनराव वानखेडे, प्रभाकरराव बनकर, डॉ.संजय घाटे, नगरसेवक प्रशांत दानव, विजय चहारे, पांडूरंग गावतुरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. उमेश नावाडे, नगरसेविका वंदना तिखे, नगरसेविका शितल गुरनुले, लोनबले, संजिवनी चहारे, राजू बनकर, निलेश खरबडे, डॉ. मनोहर लेनगुरे, धनंजय दानव, विलास वानखेडे, माजी नगरसेवक रवि गुरनुले, भाजपा जिल्हा महामंत्री राहूल सराफ, राजेंद्र वानखेडे आदी उपस्थित होते.
ना. अहीर पुढे म्हणाले शेती विकास, युवकांना प्रशिक्षण व कौशल्य विकास आदी विषयावर केंद्र व राज्य सरकार प्राधान्य क्रमाने कार्यरत आहे. व त्याचे चांगले परिणाम आपण अनुभवतो आहोत. शेवटच्या घटकांचा विकास हे सरकारचे धोरण असल्याने या घटकांसाठी अनेक महत्वाकांक्षी योजना राबविल्या जात आहेत. मातीशी नाड जोडलेल्या व मातीशी नाते जपणाºया माळी समाज बांधवांनी या योजनांचा लाभ घेत उत्कर्ष साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आ. शामकुळे यांनी उपवर-उपवधू मेळाव्याचे आयोजन हे बदलत्या काळाला व परिवर्तनशील विचाराला अंगिकृत करणारे लक्षण आहे. असे प्रतिपादन केले. त्यानंतर पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी क्षत्रिय माळी समाज सेवा मंडळाचे, माळी समाज महासंघाचे पदाधिकारी व माळी समाजातील उपवर- उपवधू व शेकडो समाज बांधव उपस्थित होते.