गोंदिया - जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात प्रेमीयुगलाने विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैशाली भरम आणि अमन रहांगडाले असे आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.
वैशाली ही इयत्ता १० वीच्या तर अमन हा इयत्ता १२ वीच्या वर्गात शिकत होता. जिल्हा परिषदेच्या एकाच शाळेत शिकणाऱ्या दोघांचे गेल्या वर्षभरापासून प्रेमप्रकरण सुरु होते. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी मुलीच्या भावाने दोघांना एकत्रित पाहिले होते. त्यामुळे या भीतीपोटीच दोघांनी आत्महत्या केली असावी, असा संशय वर्तविला जात आहे. दरम्यान, तिरोडा येथील रुग्णालयात दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.