2 आरोपींना अटक , वरोरा डी. बी.पथकाची कार्यवाही
वरोरा प्रतिनिधी:
शहरातील नागपूर - चंद्रपूर महामार्गावर दि. 1 फेब्रुवारी रोजी नागपूर मार्गाकडून एक गाडी अवैध दारूची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती मिळताच डी. बी. पथक वरोरा ने नागपूर - चंद्रपूर महामार्गावरील आनंदवन चौक येथे नाकाबंदी करून गाडी क्रमांक एम. एच. 05 ए. जे. 7537 या गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये 2 लाख 30 हजार 400 रुपये किमतीची विदेशी दारू व चारचाकी गाडी असा एकूण 7 लाख 30 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 आरोपी नामे अर्पित अनिल पाटील रा. नागपूर व कडोरी महेश साहू या दोघांना अटक केली आहे. सदर कारवाही उपविभागीय पोलीस अधिकारी प्रताप पवार व पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक विनीत घागे व डी. बी. पथक वरोरा यांनी केली आहे.