*रामधूनातून स्वच्छता संदेश * तुकडोजी महाराज व महात्मा गांधी पुण्यतिथी
नांदाफाटा /प्रतिनिधी:
राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा समीती व गुरुदेव सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने बिबी येथे दोन दिवसीय पुण्यतिथी महोत्सव नुकताच उत्साहात पार पडला. रामधूनच्या माध्यमातून गावात स्वच्छतेचा जागर करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना प्रबोधनात्मक आदरांजली वाहण्यात आली. भजन, किर्तनातून प्रबोधन महोत्सवात रंगत आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अँड.वामनराव चटप होते.विशेष अतिथी म्हणून समाजसेवक डाँ.गिरीधर काळे, निर्मला खडतकर, जि.प.सदस्य शिवचंद्र काळे, पं.स.सदस्या सविता काळे, प्रा.आशिष देरकर, राहूल आसूटकर, शंकर आस्वले, नामदेवराव ढवस, मारोती लेडांगे, आनंदराव पावडे, संतोषकुमार पावडे, गुलाबराव काकडे, मारोती पाचभाई, खुशाल गोहोकर, दिवाकर वाघमारे, महादेव हुलके, बापूजी पिंपळकर, वासुदेव बेसुरवार, हंसकर गुरुजी, चौधरी महाराज, किन्नाके महाराज, साईनाथ कुळमेथे आदी मान्यवर उपस्थित होते.
दोन दिवशीय पुण्यतिथी महोत्सवात गावातून टाळ, भजनाने रामधून व पालखी काढण्यात आली. यात नांदा, बिबी व गडचांदूर येथील पाच महिला भारुड भजन मंडळाच्या महिलांनी सहभाग घेतला. सामुदायिक ध्यान व प्रार्थना तसेच ग्रामसफाई ग्रामस्थांनी पुढाकार घेवून केली. वाशीम येथील सप्तखंजरीवादक पंकज पाल महाराज यांनी किर्तनातून ग्रामप्रबोधन केले. यवतमाळ येथील गजानन सुरकर यांनी काल्याचे किर्तन केले. विशेष कार्यपुर्ती निमीत्य शुभम ढवस, संतोष ढवस, अजय उरकुडे, सुरेश टेकाम या सैन्यदलात निवड झालेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला तर साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी कवी अविनाश पोईनकर यांना सन्मानित करण्यात आले.
गावात एकोपा व आदर्श ग्राम निर्माणासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार प्रेरणादायी असल्याचे मत अँड.वामनराव चटप व्यक्त यांनी केले. यावेळी स्वच्छ परिसर व सजावट स्पर्धेचे पारितोषिक महिलांना देण्यात आले. प्रास्ताविक बापुजी पिंपळकर, संचालन अविनाश पोईनकर तर आभार सुरज लेडांगे यांनी माणले. चंदू पिंपळकर, रामकिसन सोनुले, भास्कर भडके, चंदू झुरमुरे, गणपत तुम्हाणे, देवानंद पिंपळकर, राजेश खनके यांनी परिश्रम घेतले.
======================