चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तहसील कार्यालायचे नायब तहसिलदार संजय राठोड यांना रेती ट्रॅक्टर अडवणूक प्रकरणात 15 हजार रुपयांची लाच घेताना गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.
तक्ररदार हे ट्रक्टर मालक असून ते रेती घाटावरून रेती वाहतूक करत असतांना तुला जर महिनाभर रेती वाहतूक करायची असेल तर मला १७ हजार रुपये द्यावे लागतील,असे सांगितले तक्रारदारास हि रक्कम द्यायची नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचेकडे तक्रार दाखल केली.यावरून गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान ब्रम्हपुरी १५ हजार रुपये देत असतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नायब तहसीलदार यांना रंगेहात अटक केली. हि बाब संपूर्ण तहसील कार्यालयात वाऱ्या सारखी पसरली .व त्यामुळे सर्व महसूल विभागात धास्ती चे वातावरण निर्माण झाले
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त /पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील ला.प्र.वि. नागपूर,अप्पर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर ला.प्र.वि,नागपूर,पोलीस उपअधीक्षक रोशन यादव नागपूर, तसेच पोलीस उप अधीक्षक डी.एम. घुगे, ला.प्र.वि.गडचिरोली यांचे मार्गदर्शनाखाली एम.एस.टेकाम पोलीस निरीक्षक,पोलीस हवालदार विठोबा साखरे,सत्यम लोहम्बरे,रवींद्र कत्रोजवार,महेश कुकडकार,गणेश वासेकर,घनशाम वडेट्टीवार आदींनी पार पाडली