সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, February 03, 2018

नागपुरातील फुटाळा तलावात एकाच कुटुंबातील तिघांचा मृतदेह आढळला

नागपूर /प्रतिनिधी:
नागपुरातील तेलंगखेडी हनुमान मंदिर परिसरातील एका परिवारातील तिघांचा मृतदेह नागपूर येथील  फुटाळा तलावात आढळला आहे मृतांमध्ये पती-पत्नी आणि पाच वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही. 
नीलेश शिंदे (वय ३५), पत्नी रुपाली शिंदे (३२) आणि मुलगी नाहली शिंदे (५) अशी आत्महत्या केलेल्या तिघांची नावे आहेत. तेलांखाडी हनुमान मंदिर परिसरात ते राहत होते. तिघांनी काल (शुक्रवारी) रात्री आत्महत्या केल्याचं समजतं. याबाबत माहिती मिळाल्यानंतर आज सकाळी अंबाझरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. या तिघांनी आत्महत्या का केली, यामागचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही, असं पोलिसांनी सांगितलं.





শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.