সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, December 10, 2017

लाटणे मोर्चा घेऊन मुन्ना यादवला पकडून देऊ

#हल्लाबोल पदयात्रेच्या नवव्या दिवशी बुटीबोरीकडे मार्गक्रमण करताना आसोलाजवळ #धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. खासदार @supriya_sule यांना शाल-श्रीफळ भेट देत धनगर समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी त्यांनी केली.
नागपूरमध्ये महिलांना सुरक्षित वातावरण वाटत नाही- सुप्रिया

बुटिबोरी सभा-  राष्ट्रवादी हल्लाबोल

बुटिबोर/ प्रतिनिधी -
मुन्ना यादवला अटक होत नाही याला जबाबदार आहेत. मी माथुरजींना सांगू इच्छिती की तुम्ही राज्याची कायदा व सुव्यवस्था पाहा. आम्ही महिला लाटणे मोर्चा घेऊन या मुन्ना यादवला पकडून देतो, असा प्रतिपादन सुप्रिया सुळे यांनी केले. बुटिबोरी सभेत त्या बोलत होत्या.
मा. शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा मी दरवर्षी हिवाळी अधिवेशनानिमित्त नागपूरला येत असे. मी लहान होते तरीही नागपूरमध्ये फिरताना कधीच भीती वाटली नव्हती. पण आता नागपूरमध्ये महिलांना सुरक्षित वातावरण वाटत नाही, असेही त्या म्हणाल्या
या सरकारने शिवस्मारकाच्या भूमिपूजनावर पाच कोटी खर्च केले. तेच पैसे जर स्मारकासाठी खर्च केले असते तर आतापर्यंत काम चालू झाले असते.
राज्य सरकार जाहिरातींवर वारेमाप खर्च करत असल्याची बाब समोर आली. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील स्मारकाची जाहिरात जोरात केली. मात्र दोन्ही स्मारकांचे काम सुरू झालेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका गोष्टीसाठी दाद द्यावी लागेल. ते सफाईनं खोटं बोलतात. 'मी लाभार्थी'च्या कॅम्पेनमध्ये सर्व खोट्या जाहिराती केल्या गेल्या होत्या. त्यामुळेच ते कॅम्पेन बंद करावे लागले. विदर्भात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. इथल्या महिलांची पांढरी कपाळं पाहून पोटाला पिळ बसतो. मला प्रश्न पडलाय इतकं सगळं विदर्भात होत असताना मुख्यमंत्र्यांना झोप तरी कशी लागते, असा हल्ला त्यांनी चढविला.

 
हल्लाबोल पदयात्रेच्या निमित्ताने गेले नऊ दिवस आम्ही विदर्भाचे हाल पाहत आहोत. दुष्काळ, अवकाळी पाऊस यामुळे झालेले नुकसान नैसर्गिक असते. मात्र विदर्भात सरकारच्या नाकर्त्या वृत्तीमुळे अनेक संकटे उभी राहिली आहेत.
- बुटिबोरी सभा


फसव्या योजना आणि यांचा फोटो जनतेला दाखवण्यासाठी ने साडेतीन हजार कोटी खर्च केले आहेत. यांनीही ३५० कोटी जाहिरातींवर खर्च केले.
- बुटिबोरी सभा

नोटाबंदीनंतर जीएसटीचा झटका सरकारने दिला. सुरुवातीला जीएसटी कसा भरायचा हे व्यापाऱ्यांना न कळल्यामुळे व्यवहार करणेच त्यांनी बंद केले होते. - बुटिबोरी सभा
बोंड अळीचे संकट नैसर्गिक असले तरी हा प्रश्न सोडवता आला असता. योग्य वेळीच बियाणे तपासून बदलले गेले असते तर आज विदर्भातील जनतेला अश्रू ढाळण्याची परिस्थिती आली नसती.
-

 
कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न आहे. ज्यांच्यावर रक्षण करण्याची जबाबदारी आहे ते पोलिसच माणसांना जाळून मारत असतील तर सामान्य जनतेने कुणाकडे न्याय मागायचा? त्यामुळे जनतेने आता १२ डिसेंबर रोजी नागपूर येथे सभेला पांठिबा देऊन सरकारचा धिक्कार करावा.

विदर्भातील लोकांचा भ्रमनिरास झालाय. शेतकरी देशोधडीला लागलाय. बेरोजगारी वाढली. जुन्याजाणत्या लोकांना माझं सांगणं आहे की विदर्भातील जनता एकटी नाही. सर्व महाराष्ट्र विदर्भातील जनतेच्या पाठीशी उभी आहे. त्यासाठीच हा आहे.

 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.