সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, December 19, 2017

चित्रपट दिग्दर्शनवर पाच दिवशीय कार्यशाळा

चंद्रपूर- होरायझन ऐटंरनमेंट, अमूल रामटेके पिक्चर, ख़ुशी फिल्म्स आणि लावण्यप्रिया क्रिएशन ह्याचा सौजन्याने चंद्रपूर शहरात पहिल्यांदाच चित्रपट दिग्दर्शन, पटकथा लेखन आणि अभिनय ह्यावर पाच दिवशीय कार्यशाळा दिनांक 23 डिसेंबर ते 27 डिसेंबरला सकाळी १० ते ५ ह्या वेळेत ‘वासनिक सर एकाडमी’, जुबिली शाळेचा बाजूला, लक्ष्मी डीजीटलचा समोर, शासकीय वाचनालयाचा शेजारी, कस्तुरबा रोड, चंद्रपूर इथे आयोजित करण्यात येत आहे.
ह्या चार दिवशीय कार्यशाळेत चित्रपट दिग्दर्शन, पटकथा लेखन, लघुपट, माहितीपट, वेब सिरीज, मुजिक वीडीओ, सिनेमा बनवण्याची कला आणि अभिनय ह्याबद्दल सविस्तर माहिती आणि प्रात्यक्षिक करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. कार्यशाळेत प्रत्येक दिग्दर्शक विध्यार्थाला स्वतःची 7 ते 8 मिनिटांची लघुकथा लिहून ती लघुकथा स्मार्ट फोनवर दिग्दर्शशीत करण्याची तसेच अभिनयामध्ये असलेल्या विध्यार्थाना त्या लघुपटात अभिनय करण्याची संधी मिळणार आहे.
ह्या पाच दिवशीय कार्यशाळेला शैलेश भीमराव दुपारे ह्याचे मार्गदर्शन मिळणार आहे. शैलेश भीमराव दुपारे हे भारतीय फिल्म आणि टेलिवीजन संस्थानचे(FTII) विद्यार्थी असून त्यांनी सचिन खेडेकर अभिनित ‘तार्यांचे बेट’ हा मराठी सिनेमा लिहिला असून ‘का रे दुरावा’ ह्या मराठी मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. तसेच चंद्रपूरचा स्थानिक कलावंताना घेवून चंद्रपूर मध्ये ‘नूर’ हा लघुपट तयार केला आहे. तसेच अभिनयाचा विद्यार्थांना सुशील सहारे सर ह्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या कार्यशाळेला वयाचे बंधन नाही. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ह्याचा फायदा घ्यावा असे आव्हान सुशील सहारे, शैलेश दुपारे, अमूल रामटेके, संजय वासनिक, प्रेम रायपुरे आणि फुलचंद मेश्राम ह्यांनी केले आहे.  

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.