चिमूर/तालुका प्रतिनिधी
चिमूर तालुकातील नेरी जवळ असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी गोंदेडा येथे २९ डिसेंबर २०१७ ते २जानेवारी२०१८ पर्यंत श्री गुरुदेव साधना श्रम गुंफा यात्रा महोत्सव गोंदेडा तालुका चिमूर जिल्हा चंद्रपूर च्या वतीने५८ वा गुंफा यात्रा महोत्सव साजरा करण्यात येत आहे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी गोंदेडा या परिसरात असलेल्या गुपेत महाराजांनी साधना करून संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश दिला त्याच्या या सर्व लोकपयोगी कार्यात प्रेरणा देणारी भूमी म्हणजे च गोंदेडा राष्ट्रसंतांनी या भूमी मध्ये यात्रा महोत्सवला ५७ वर्ष पूर्ण झालीअसून यावर्षी ५८ वा गुंफा यात्रा महोत्सव २९ डिसेंबरला सकाळी ५ वाजता ग्राम सफाई सामुदायिक ध्यान विचार प्रकटन व रामधून निघणार आहे सकाळी ८ वा घटस्थापना कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडनार आहे
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून किशोर डांगे अध्यक्ष गुंफा यात्रा महोत्सवस समिती गोंदेडा, शंकरराव कामडी उपाध्यक्ष, सौ वैशाली सोनुने, मेघाताई राचालवार,रामदास जांबुले, परशराम ननावरे, गिरीश भोपे,राजेंद्र धारने, सरपंच गोंदेडा, अविनाश बावणे माणिक वाढई,तथा सर्व कार्यकरणी सदष श्री गुरूदेव कार्यकर्ता व ग्रामवासी यांच्या उपस्थितीत पार पडनार आहे
गोंदेडा तपोभूमी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन म्हणून प्रकाश पंत वाघ, सर्वाधिकारी गुरुकुंज मोझरी, अशोक नेते, खासदार गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्र, देवरावजी भोंगडे, अध्यक्ष जि,प, चंद्रपूर, मितेश जी भांगडीया आमदार विधान परिषद,बंटी भाऊ भांगडीया चिमूर विधानसभा क्षेत्र, विशेष उपस्थिती म्हणून कृष्णाजी सहारे, उपाध्यक्ष जि प चंद्रपूर, विद्या ताई चौधरी, सभापती चिमूर किशोर जी डांगे, राजेंद्र धारने, जीतू भाऊ होले, अमरावती आदींचे मार्गदर्शन होणार आहे त्या नतंर अहवाल वाचन प्रा,भास्कर वाढई करणार आहे,संचालन प्रा,प्रकाश सोनुने व आभार भोयर सर करणार आहे भाविक भक्त मंडळी तसेच सर्व जनतेने मोठ्या संख्येनेउपस्थिती दर्शवावी असे आवाहनसमितेने केले आहे,