रामटेकचे आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांचा आज जन्मदिवस
गोरगरीबांच्या कल्याणासाठी सातत्याने धडपडणारा प्रसंगी स्वतःच्या कमाईचे पैसे खर्च करणारा व मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे याचे आचरण करणारा सेवाव्रती म्हणून म्हणून रामटेकचे विद्यमान आमदार डी.मल्लिकार्जुन रेड्डी यांचे नाव रामटेक विधानसभा क्षेत्रांत अग्रक्रमाने घ्यावे लागते.कोणताही राजकीय वारसा नसतांना केवळ आपल्या समाजसेवेच्या भरवशावर 2014 साली झालेल्या विधानसभेच्या सर्वत्रिक निवडणुकीत त्यांचा 10 हजारावर मतांनी विजय झाला यावरून त्यांच्या सेवाव्रती स्वभावाची जादू रामटेक विधानसभा क्षेत्रांत कीती प्रभावी आहे हे लक्षात येते. परप्रांतीय,फारसे शिक्षण झालेले नाही,सामाजीक व आर्थिक बाजुही फारसी मजबूत नाही.त्यांचे वडील रामटेक भागात आले व रेड्डी साहेबांनाही त्यांचेसोबत येथे यावे लागले.सुरूवातीला छोटे,मोठे कामे घेत त्यांनी ठेकेदारीचा व्यवसाय प्रारंभ केला.चिकाटी,शिस्त व जिद्द या स्वभावगुणांनी त्यांनी अल्पावधीतच या व्यवसायात नाम कमविले.कामाचा उत्तम व गुणवत्तापुर्ण दर्जा हे त्यांच्यातील ठेकेदाराचे आणखी एक वैशिष्ट्य .आपल्याला या भागातील जनतेने मोठे केले ही भावना असल्याने त्यांनी आपल्या वडीलांच्या स्मरणार्थ आपल्या काही मीत्रांना सोबत घेवून डी.रामी रेड्डी संजीवनी मेमोरीयल संस्थापंजीबद्ध केली व या भागात पहील्यांदा सुसज्ज रूग्णवाहीका सुरू केली.
सर्वकाही स्वतःच्या मीळकतीतून व निस्वार्थपणे करण्याचा त्यांचा आग्रह होता.नंतरच्या काळांत त्यांनी मनसर सह देवलापार,पारशिवनी व कन्हान या भागातही रूग्णवाहीका उपलब्ध करून दिल्या.व या सर्व सेवा आजही अखंडीत सुरू आहेत.संस्थेच्या स्थापनादिनाला दरवर्षी या भागातील सर्वसामान्यांना टिनपत्रे,अपंगाना ट्राय सिकल,रामटेक तालुक्यांतील सर्व शाळांच्या प्रत्येकी गरजू दहा विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश व पाठयपुस्तके,पर्यावरणाच्या रक्षणासाठी गावागावात रस्त्याच्या कडेने वृक्षारोपण आदी नियमीतपणे ते राबवितात.
राजकारणांत येवून जनता जनार्दनासाठी अजून जास्त करता येईल ही भावना मनात आल्याने दोनवेळा आमदारकी लढविली पण यशआले नाही.मागच्या निवडणुकीत मात्र भाजपासेना युती ऐनवेळी तुटली व भाजपाचे नेतेनामदार नितीनजी गडकरी यांनी रेड्डी यांना भाजपाची रामटेक विधानसभेतूनउमेदवारी दिली.एकूणच देशात व महाराष्ट्रात परीवर्तनाची लाट होती.त्यांचे स्वतःचेही समाजकार्य लोकांपुढे होते व त्यामुळे ते रामटेक विधानसभा क्षेत्रांतून विजयाी झाले.गेल्या तीन वर्षांत त्यांनी आमदार म्हणून जे काही काम केले ते जनतेपुढे आहे.रामटेकचा 150 कोटी रूपयांचा विकास आराखडा मंजूर करवून घेण्यासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा व प्रयत्न प्रशंसनीय आहेत.अजून सुमारे दोन वर्षाचा त्यांचा आमदारकीचा कार्यकाळ शिल्लक आहे.
रामटेकचा शिर्डी-शेगांवच्या धर्तीवर विकास करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे यासाठी शासनदरबारी ते फार प्रयत्नशील व आग्रही आहेत.त्यांनी स्वतःला मीळणारा आमदारकीचा पगारही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूबांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री निधीला दिला आहे.