সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, December 19, 2017

बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचा - तीसरा वर्धापनदिन संपन्न

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 राज्यात बांबू धोरणाची व्यापक अंमलबजावणी करण्यासोबत शास्त्रोक्त पध्दतीने बांबूची लागवड करण्यात येत आहे. तसेच औद्योगिक वापरासाठी प्रसार करण्याकरीता आणि बांबूवर आधारित स्वयंरोजगाराची नवीन संधी उपलब्ध करुन देण्यासाठी स्थानिक कारागीरांना तंत्रज्ञानाचा वापर करुन मुल्यवर्धीत बांबूच्या वस्तु तयार करण्याच्या उद्देशाने राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना चिचपल्ली येथे करण्यात आली आहे. या केंद्राचे संचालक राहुल पाटील यांच्या कल्पनेतून अन्य नियमीत कलात्मक वस्तुबरोबरच अनेक उपक्रमाची अंमलबजावणी या केंद्रात केली जात आहे. मा.सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचा तीसरा वर्धापनदिन लॅमेला हॉल वनप्रशासन विकास व मव्यवस्थापन प्रबोधिनी चंद्रपूर येथे पार पडला. यावेळी वने सचिव विकास खारगे, महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस.के.रेड्डी, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, वनविकास महामंडळाचे महाव्यवस्थापक मुकेश गणात्रा, प्रबोधिनीचे संचालक अशोक खडसे, मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, ताडोबा (बफर) प्रकल्पाचे उपसंचालक गजेंद्र नरवणे, कोर प्रकल्पाचे उपसंचालक किशोर मानकर, वनप्रबोधिनीचे अपर संचालक श्री.धानके, चंद्रपूर वनविभागाचे विभागीय वनअधिकारी श्री.सोनकुसरे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील यांनी केले. तेव्हा त्यांनी या केंद्राच्या स्थापनेपासून 209 प्रशिक्षार्थ्यांना प्रशिक्षण दिले असून सन 2017-18 करीता बांबू विषयक पदविका डिप्लोमा इन बांबू टेक्नोलॉजी हा दोन वर्ष
कालावधीचा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला असल्याचे सांगितले. अभ्यासक्रमामध्ये 14 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्याचे सांगून तीन वर्षात या केंद्रात झालेल्या प्रगतीसंबंधी सविस्तर माहिती त्यांनी यावेळी दिली. वने सचिव विकास खारगे यांनी बांबू विषयक पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करुन भविष्यात एक यशस्वी बांबू उद्योजक कशा प्रकारे बनता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. तसेच बांबू हे बहुपयोगी गवत प्रजाती असून त्याचा उपयोग बांधकाम आणि वस्त्रोद्योगात सुध्दा करता येतो. याच माध्यमातून बांधकामात इतर लाकडाऐवजी बांबूचा मोठया प्रमाणात वापर करता येत असून बांबूपासून वस्त्रनिर्मितीसाठी धागे तयार करता येतात. भविष्यात आधुनिक तंत्रज्ञानाची यासाठी मदत घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक टी.एस.के.रेड्डी यांनी बांबूची शेती करतांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल व दैनंदिन जीवनातील बांबूचे महत्व आणि आर्थिक दर्जा कसा उंचावेल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी सुध्दा बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची चिचपल्ली येथे साकार होत असलेली जागतिक दर्जाची एक भव्यदिव्य आगळीवेगळी इमारत व भविष्यात त्याला प्राप्त होणा-या महत्वाबाबत विस्तृतपणे माहिती दिली.
या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे महिलांना स्वावलंबी करण्यासाठी विविध बांबू वस्तु बनविण्याचे प्रशिक्षण चंद्रपूर व विसापूर येथील बचत गटातील महिलांना देण्यात येत आहे.
आतापर्यंत 14 बचत गटातील 200 महिलांना बांबूपासून विविध वस्तु बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हिरवई धनलक्ष्मी महिला बचतगट, आफिया महिला बचतगट, शारदा महिला बचतगट, सहेली महिला बचतगट, उज्वल महिला बचतगट, समुह महिला बचतगट व
उन्नती महिला बचतगट अशा अनेक महिला बचतगटांना बांबू वस्तु तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहेत. सद्यास्थितीत या महिला चंद्रपूर येथील सर्वसाधारण उपयोगीता केंद्रामध्ये प्रशिक्षण घेत आहेत. तर विसापूर येथील बचतगटातील महिलांसाठी सर्वसाधारण उपयोगीता
केंद्र उभारणे प्रस्तावित आहे. त्यामुळे जिल्हा परिषेदेने उपलब्ध करुन दिलेल्या इमारतीमध्ये तात्पूरत्या स्वरुपात या महिलांना प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती संचालकांनी दिली.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.