সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, December 21, 2017

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या त्वरित पूर्ण करा: विधानसभेतआ.बाळू धानोरकर यांचा आवाज

dhanorkar साठी इमेज परिणामवरोरा/भद्रावती (प्रतिनिधी) 
प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या त्वरित पूर्ण करा अशी मागणी भद्रावती वरोरा मतदारसंघाचे आमदार बाळू धानोरकर यांनी विधानसभेत केली आहे .
धानोरकर म्हणाले वरोरा परिसरातील वर्धा पॉवरप्लांट, धारीवाल पाॅवर प्लांट तसेच इतर प्रकल्पांमध्ये जमीन धारकांच्या मागण्या अद्यापही शासनाने पूर्ण केलेल्या नाहीत. या संदर्भात अनेकदा आंदोलने करण्यात आली, निवेदने सुद्धा देण्यात आली. आ. धानोरकर सभागृहात पुरवण्या मागण्या सादर करत होते.
     
परंतु शासनातर्फे कुठलीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना नाहक त्रास सहन करावा लागत असून त्यांची पिळवणूक होत आहे. तरीही प्रशासनाने तात्काळ कारवाई करीत यासंबंधी ठोस निर्णय घेण्याची मागणी धानोरकर यांनी केली आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.