সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, December 17, 2017

अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू

मूल/प्रतिनिधी:
Image result for accident
दुचाकी व चार चाकी वाहनात समोरासमोर धडक झाल्याने  अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी 2 वाजता  मूल-चामोर्शी मार्गावर दरम्यान घडली. तर मागे बसलेला व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .


सावली तालूक्यातील चारगाव येथील रहिवासी बंडू डोमाजी बांबोडे वय (58) हा चांडली (बु) येथील रामा मर्लावार वय (65) या सहकाऱ्याला आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच.34.ए.5546 ने चांदल (बु) वरून मूल कडे येत होता . याच मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या  मॅक्स (मॅजिक )ही चारचाकी वाहन क्रमांक एम. एच. 18 बीजी 0451 जात असतांना उमानदी पुलाजवळ दोन्ही वाहने समोरासमोर भिडले . या घटनेत दुचाकी वाहन चालक जागीच मृत्यू झाला. त्याचा सहकारी गंभीर जखमी असुन त्याला गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरीता भरती करण्यात आले.तर या घटने नंतर चारचाकी वाहन चालक प्रकाश सोमन्ना गांगरेड्डीवार वय (56) रा. चंद्रपूर याने घटनेनंतर स्वतः पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले असल्याची माहिती आहे  .

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.