चंद्रपूर/प्रतिनिधी:
शालेय पोषण आहार आणि शैक्षणिक बाबी संदर्भात ईतर महत्वाच्या बाबीवर चर्चा करण्यासाठी गोंडपिपरीच्या पं.स. सभापती श्री.दिपक सातपुते यांनी आज दिनांक गुरुवारी महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची विधानभवनात भेट घेतली. जवळपास अर्धा तास चालणाऱ्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा टप्पा सुरु असल्याने गोंडपिपरी पं.स.सभापती दिपक सातपुते यांनी शालेय पोषण आहार आणि अनेक शैक्षणिक बाबीसंदर्भातील महत्वाच्या विषयावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली असून विभागातील अनेक समस्यांवर लवकरच तोडगा काढू असा शब्द देखील दिला.