खरकाडा येथील घटना
चिमूर/शहर प्रतिनिधी
चिमूर वरून ६ कि.मी. अंतरावर खरकाडा समोरील वळणावर सुसाट वेगाने परतीचा मार्गावर असलेल्या टाटा सुमो क्र. एम.एच. ३१ ए.एच. ५०३७ वाहनाने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली असल्याने अपघातामध्ये श्रावण जांभुळे (खरकाडा वय ५५), याचा चिमूर रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच गंगाबाई श्रावण जांभुळे (वय ४५) व नशीब बलवत्तर असल्याने उत्कर्ष प्रवीण जांभुळे (वय 5) वर्ष अपघातात त्याचा पाय फॅक्चर झाला आहे.
तसेच उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल केले असता श्रावण जांभुळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघात झालेले व्यक्ती खरकाळा येथील असून ते पिंपळगाव वरून गावाकडे येत असतांना गावालगतच त्यांचा अपघात झाला. तसेच धडक देणारा आरोपी हा गाडीसह पळ काढला असून त्याला भिसी पोलीस स्टेशन हद्दीत पकडण्यात आले आहे. पवन शामराव मुनघाटे (वय २४ रा. हिरापूर) असून तो साक्षगंध कार्यक्रमाला मुरपार येथे गेला होता. त्याला चिमूर पोलिसांचा स्वाधीन करण्यात आले असून समोरील तपास चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. सोनूले करीत आहे.