मारोडावासियांत वाघाची भीती
चंद्रपूर, दि.
सोमनाथ जंगला नजीकच्या मारोडा गावांत शनिवारच्या रात्री घडलेल्या घटनेने भीतीचे वातावरण पसरले असून वाघाच्या हल्ल्यातून बचावलेल्या शेतमजूराची अजूनही दहशतीतून मुक्तता झालेली नाही. दरम्यान रानडुकरांच्या उन्मादाने पीकांची नासाडी सहन केलेल्या मारोडावासियांनी वनविभागावर आपला रोष व्यक्त करत वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
शनिवार रात्री साडे सात च्या दरम्यान फडणवीस पाटलांचा रखवालदार शेतीच्या रखवालीसाठी नेहमीप्रमाणे निघाला होता. गावातील मादगी मोहल्ला जवळ झुडपे वाढली असून अंधारात त्याला काही दिसले नाही. थोडे पुढे जाताच समोर वाघ असल्याचे त्याने पाहिले. जीवाचा आटापीटा करुन त्याने ओरड केली. त्यामुळे परिसरातील लोक लगेच तिकडे धाावले. लोकांचा समूह हातात लाठ्या काठ्या घेवून धावताच वाघ पळून गेला. झाली घटना वनविभागस कळवण्यात आली. वनविभाग ने वाघाच्या पंज्याचे निशाण पाहून खात्री केली.
मारोडा या गावंपरिसरातील लोकांची धान शेती रानडुकरांनी फस्त केली. याचा रोष व्यक्त करत मारोड्यातील युवा सामाजिक संघटनेने थेट वनमंत्र्यांचे घर गाठले. त्यांना सर्व हकिकत सांगितली. रानडुकरांमुळे झालेले नुकसान भरपाई करुन देण्याची मागणी केली. प्रत्यक्षदर्शी निरंजन वाळके, विकास गेडाम, अल्लीवार, प्रकाश गोरडवार, शेंडे, बंडू खोब्रागडे यांनी सांगितले की, वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी शेतक-यांची मदत करायला तयार नाहीत. वनमंत्र्यांकडे तक्रार करुनही काही फायदा झाला नाही. त्यातच गावात वाघ आल्याने आता नागरिकांचा संताप वाढला आहे.