সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, December 21, 2017

राज्यस्तरीय साहित्य संमेलनात प्रतिनिधींचे कविसंमेलनासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर तर्फे १० आणि ११ फेब्रुवारी २०१८ ला चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात राज्यस्तरीय सूर्यांश साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
प्रख्यात लेखक आणि कादंबरीकार राजन खान या संमेलनाचे अध्यक्ष असून ज्येष्ठ विचारवंत आणि कवी डॉ.  यशवंत मनोहर या संमेलनाचे उदघाटन करतील. पहिला युवा साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी ऐश्वर्य पाटेकर हे विशेषत्वाने उपस्थित असतील.महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कवी, लेखक आणि साहित्यीक या संमेलनात सहभागी  होणार असून दोन दिवस चालणार्‍या या संमेलनात कथाकथन, कविसंमेलन, प्रकट मुलाखत,परिसंवादासह अन्य उपक्रम होणार आहे. संमेलनात निमंत्रितांचे २ कविसंमेलन असून महाराष्ट्रातील नामवंत कवी कवीसंमेलनात सहभागी होणार आहेत.

कविसंमेलनातील निमंत्रित कवींशिवाय राज्याच्या विविध  भागातून येणाऱ्या तसेच चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातल्या कविनांही आपल्या कवितेच्या सादरीकरणाची संधी मिळावी या करिता संमेलनात दोन्ही दिवस प्रतिनिधींचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.या प्रतिनिधींच्या कविसंमेलनात सहभागी होणार्‍या कवींना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, संमेलनकिट यासह दोन्ही दिवसाचे निवास आणि भोजन व्यवस्था केवळ १०००/- रुपये प्रतिनिधीशुल्क भरुन सहभाग नोंदवता येईल. तसेच ज्या प्रतिनिधींना निवासव्यवस्था नको असेल ते केवळ ५००/- प्रतिनिधीशुल्क भरुन प्रतिनिधिंच्या कविसंमेलनात  सहभागी होऊ शकतात.
प्रतिनिधींच्या कविसंमेलनात निवडक  कवींचीच नोंदणी करण्यात येणार असल्याने ज्या कवीना प्रतिनिधींच्या कविसंमेलनात आपली नोंदणी करावयाची असेल त्यानी दिनांक १५ जानेवारी पर्यंत संस्थेचे सचिव श्री प्रदीप देशमुख यांचे ९४२१८१४६२७ आणि प्रसिद्धिप्रमुख गीता रायपुरे यांचे ९९७५३४९५५५ क्रमांकावर तसेच अधिक माहितीकरीता संस्थेचे अध्यक्ष इरफान शेख यांचे ९६६५४१३८२१ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.