चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2018 ची सुरुवात मोठ्या धडाक्यात सुरू केली. यासाठी चंद्रपुरात 3 स्वच्छता दुतांची नियुक्ती केली असल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले. यात गडचिरोली आदिवासी नक्षलग्रस्त जिल्ह्यातील सर्च संस्थेचे संस्थापक डॉ. अभय बंग, प्रसिद्ध चित्रपट अभिनेता अमेय वाघ तसेच चंद्रपूर येथील नाट्य दिग्दर्शिका डॉ. जयश्री कापसे गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र इको -प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रेया कामाची दखल घेण्यात न आल्याने शहरातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या "मन की बात" मधून चंद्रपूरच्या स्वच्छता मोहिमेचा
उल्लेख केला होता. मात्र चंद्रपूर महानगरपालिकेला इको- प्रोचा विसर पडल्याचे दिसून आले. स्वच्छतेच्या कार्यात स्वतःला व सवंगड्यांना झोकून काम करायला लावणाऱ्या बंडू धोत्रे यांची स्वच्छता दूत म्हणून निवड होईल, अशी अपेक्षा होती. पण तसे न झाल्याने जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. जिल्ह्यात 250 दिवसांहून अधिक दिवस स्वच्छतेसाठी रात्रंदिवस एक करणाऱ्या बंडू धोत्रे च्या नावाची मागणी विविध स्तरातून करण्यात येत आहे.