সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, December 15, 2017

भिसी येथे बैलबंडी मोर्चा

  •  
  • जिल्हा परिषद सतिश वारजूरकर नेतृत्व
चिमूर /तालुका प्रतिनिधी
चिमुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरीता जिल्हा परिषद चंद्रपुर चे माजी अध्यक्ष तथा विद्यमान गटनेता सदस्य डॉ.सतिश वाऱजूकरांच्या नेतृत्वात भिसी येथे बैलबंडी मोर्चा काढण्यात आला, या मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या शासन दरबारी मांङल्या. यामध्ये प्रामुख्याने भिसी वाढोणा येथे वनविभागाने मंजूर केलेल्या जाळीच्या कुंपणाचे निविदा पुनश्च काठण्यात याव्या, जंगली जनावरांपासुन होणारी शेतीची नुकसान भरपाई नुकसानीच्या तुलनेत देण्यात यावी, स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव व अधिकचा ५० टक्के नफा देण्यात यावा, शेतकऱ्यांसाठी २४ तास थ्री फेज विद्युत पुरवठा देण्यात यावा, कृषी पंपाची डिमांड भरताच एक महिण्याच्या आत विजजोडणी झालीच पाहिजे, गोसेखुर्द प्रकल्पाच्या मोखाबर्डी उपसा जलसिंचन कालव्याचे दुरूस्तीसह बांधकाम पुर्ण करून २०१७ ला शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणि देण्याचे आश्वासन लोकप्रतीनिधींनी पूर्ण करावे, शेतमजुरांना शेतीसाठी शासकिय जमिनीचे पट्टे वाटप करण्यात यावे, वनडेपोत बांबु व लाकडांचा पुरवठा नियमित उपलब्ध करून देण्यात यावा, भिसी परिसरातील चिचोली सावर्ला, डोंगर्ला, जांभुळविहिरा, नवेगांव, पुयारदंड, गडपिपरी, सिरसपुर, शिवरा, लावारी, इत्यादी गावातील शेतकऱ्यांच्या शेती जंगल लगत असल्यामुळे त्यांच्या शेतातील पिकांची जंगली जनावरे नासधुस करित असतात त्यामुळे सदर गावांच्या जंगल सभोवताल काटेरी कुंपन करण्यात यावे, विद्युत कंपण्यांमार्फत शेतात उभारल्या जाणाऱ्या विद्युत टावर चा शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात याव्या या मागण्या आपल्या भाषनातून मांडले आहेत. परंतू निवेदन स्विकारण्यासाठी वन विभागाचे एकही वरीष्ठ अधिकारी उपस्थीत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी निवेदन देण्यास नकार दिला व जो पर्यंत वरिष्ठ अधिकारी निवेदन घेण्यास येत नाही तो पर्यंत रास्ता रोको आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे पारिस्थीती चिघळण्याची अवस्था निर्माण झाली आहे.
     या मोर्चा मध्ये दोन ते अडीच हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे तसेच शंभरावर बैलबंडी सहभागी होत्या आहेत, आंदोलन स्थळी अल्पोहार व पाण्याची व्यवस्था होती करण्यात आले आहे तसेच भिसी पोलीसांनी आंदोलन स्थळावरुन दोन किलो मिटर दुर वाहने थांबवली आहे. सध्या ही कोणतेही अधिकारी आले नसल्याने भिसी चौरस्था येथे रास्ता रोको आंदोलन सुरूच आहे. तसेच  डॉ. सतिश वारजूकर यांच्यासह इतर आंदोलकांना पोलीसांनी अटक केली असता इतर आंदोलकांनी पोलीस गाडी समोर उभे राहून गाडी जाऊ दिली नाही, शेवटी पोलीसांनी हतबल होऊन अटक केलेल्या डॉ.वारजूकर सह इतरांना गाडीमधून उतरविले व सर्व आंदोलक परत चौरस्ता इथे रास्ता रोखुन बसले. या आंदोलनात शेतकरी महिलांची उपस्थीती लक्षणीय होती.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.