चिमुर तालुक्यातील पर्यावरण संवर्धन समीतीचे उपविभागिय अधिकारी यांना निवेदन
चिमुर-तालुका प्रतिनिधी
चिमुर तालूक्यातील चिमूर जवळील कोलारा(तू), तीरखूरा आणी भीसी जवळील गडपीपरी या ठीकाणी प्राचीन काळातील ऐतिहासीक विहीरी आहेत.ऐतीहासीक वारसा जपणे आपण सर्वाची जबाबदारी आहे .हा उद्देश समोर ठेऊन ऐतीहासीक वास्तुची स्वच्छता करण्यात आली पण त्या प्राचीन वास्तू समस्याच्या विडख्यात सापडली आहे.पूरातन काळातील ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे . त्याचे अस्तीत्व काही काळापूरतेच मर्यादित आहे .पूरातन काळातील विहिरीला वाचवण्यासाठी आणी ऐतीहासीक वारस्याचे जतन होण्यासाठी आणी रस्ता रुंदिकरणातून वाचविण्यासाठी तीन्ही विहीरीकडे प्रशासनाने लक्ष देण्यासाठी पर्यावरण संवर्धन समीती चिमुर कडुन उपविभागिय अधिकारी मार्फत जिल्हाधिकारी आणी पुरातन विभाग चंद्रपूर यांना निवेदन सादर
यावेळी पर्यावरण संवर्धन समीती चिमूरचे अध्यक्ष कवडु लोहकरे, राकेश राऊत , अमीत मेश्राम, महेश रासेकर, प्रशांत छापेकर, पीयूष जाधव, कार्तिक लोहकरे , ऋषिकेश बाहुरे, सचीन करंडे,पवन वनकर ,अमीत मोहीनकर , प्रफूल शेडामे आदि सदस्य ऊपस्थित होते