সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, December 15, 2017

गडचांदूर तालुक्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन

गडचांदुर/प्रतिनिधी :-
 गडचांदुर तालुका झाला पाहिजे
या मागणीला घेऊन दुसरा टप्पा म्हणुन १५ डिसेंबर रोजी स्थानीक गांधी चौक येथे धरणा आंदोलन आयोजीत करण्यात आले. अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष तुळशीरामजी भोजेकर होते तर उदघाटन डाॅ.भोयर यांनी केले.न.प. नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे, नगर सेविका श्रीमती मोतेवाड, चंद्रभागा कोरवते, डाॅ.चरणदास मेश्राम, संजय उके, सुनिल फुलझेले, अहेमद भाई, सोमा मुन, विठ्ठल कुसळे, देविदास मुन, मधुरकर चुनारकर, रवि पथाडे, खुशाल मेश्राम, लटारी पातुरकर, समितीचे संघटक उद्धवपुरी, सचिव अशोक उमरे इतर प्रमुख्याने उपस्थित होते.
     गडचांदुर तालुका निर्माण व्हावा यासाठी गेल्या बरेच वर्षा पासुन तालुका संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन सुरू असुन यंदा टप्प्या, टप्प्याने जन आंदोलनाला सूरूवात करण्यात आली आहे. संघर्षाचा पहिला टप्पा म्हणुन ८ डिसेंबर रोजी उपविभागीय कार्यालय राजुरा येथे भव्य संघर्ष यात्रा काढण्यात आली.दुसरा टप्पा म्हणुन १५ डिसेंबर रोजी धरणा आंदोलन तसेच तीसरा टप्पा २२ डिसेंबर रोजी नागपुर विधानसभेवर भव्य मोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे.
     उपस्थित मान्यवरांनी तालुक्याची गरज का ? या संबंधी सखोल मार्गदर्शन केले.तालुका घेतल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असे निर्धार यावेळी करण्यात आले. प्रास्ताविक डाॅ.भोयर तर संचालन व आभार मारोती जुमनाके यांनी केले.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.