जि. प. उ. प्रा. शाळा बाळापूर(बु. )येथे तंबाखू नियंत्रण कार्यक्रम
ब्रम्हपुरी- दिवसेंदिवस
शालेय विद्यार्थांमध्ये वाढणारे तंबाखूजन्य पदार्थांचे सेवनाचे प्रमाण ही
गंभीर समस्या समस्या बनली आहे. विद्यार्थयांमध्ये ऒरल सबम्युकलस या
प्राथमिक कर्करोगाचे लक्षण मोठ्या प्रमाणात दिसत आहे. याची दखल सलाम मुंबई
फाउंडेशन ने घेतली आणि म. रा. शिक्षण संचालनालय मुंबई च्याक सहकार्याने
महाराष्ट्रातील सर्व शाळामध्ये तंबाखूमुक्त कार्यक्रम राबविणे सुरू केला
आहे. या उपक्रमा अंतर्गत सी.बी. एस. सी. बोर्डाचे मानकानुसार ठरविलेले 11
निकष पुर्ण करणा-या शाळांनाच तंबाखुमुक्त शाळा घोषीत करण्याचा कार्यक्रम
हाती घेऊन तंबाखू ला राम राम ठोकला.
या उपक्रमाचाच
भाग म्हणून जि. प. उ. प्रा. शाळा बाळापूर (बू. )येथे विद्यार्थांसाठी "
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवनाचे आरोग्यावर होणारे दुष्परीणाम" या
विषयावर मार्गदर्शन मेळावा घेण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षतेस्थानी
मुख्याध्यापिका सौ. अंजली करंबे, तर प्रमुख पाहूने नवनियुक्त शिक्षक भोले
सर , व मांडवटकर सर आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून संपुर्ण जिल्ह्यात
तंबाखुमुक्त शाळा उपक्रम यशस्वी करण्यासाठी धडपडणारे हरीश्चंद्र पाल ,
राज्य स्तरीय प्रशिक्षक, सलाम मुंबई फाउंडेशन मुंबई हे उपस्थित होते.
यावेळी शाळेतील समस्त शिक्षक -शिक्षीकाची प्रमुख उपस्थिती होती.
या
वेळी मार्गदर्शन करतांना हरीश्चंद्र पाल यांनी तंबाखुचे प्रकार, सेवनाच्या
विविध पद्धती, तंबाखूमध्ये असणारे घटक, तंबाखू सोडण्याचे उपाय हे विविध
गिते, भारूड, आरती, चित्रे, पोष्टर यांचा वापर केला. त्यामुळे
विद्यार्थांनी या कार्यक्रमाचा मंत्रमुग्ध होवून आस्वाद घेतला व तंबाखू व
तंबाखूजन्य पदार्थ न खाण्याची प्रतीध्न्या घेतली.
या
मार्गदर्शन मेळाव्याचे निमीत्ताने स्व. रूख्माबाई पाल बहूउद्देशिय शिक्षण
संस्थेच्या वतीने तंबाखू सेवनाचे दुष्परीणाम दर्शविणा-या पोस्टर
प्रदर्शनिचे आयोजन केले होते.
सदर कार्यक्रमाचे संचलन व आभार मांडवटतर सर यांनी केले.