- 5 कोटी रूपयांचा बट्टयाबोळ
- कंत्राटदारावर कारवाई
- 15 लक्ष सुरक्षा ठेव जप्त
यासंबधी सविस्तर वृत्त असे की रामटेक नगरपालीका हद्दीतील गोरगरीबांना त्यांच्या हक्काची घरकुले मीळावी यासाठी षासनाकडून रामटेक नगरपालीकेला उपरोक्त योजना व निधी देण्यांत आला.प्रत्यक्षात या योजनेसाठी जागा व त्यावर बांधकाम करण्याची जबाबदारी ही नगरपालीकेची होती.एकूण 265 घरकुलांची ही योजना आज प्रत्यक्षात 72 घरकुलांची राहीली असून यासाठी षासनाने नगरपालीकेला 2 कोटी 29 लक्ष रूपयांचा निधी दिला आला आहे.यापैकी 72 घरकुलाचे बांधकामासाठी नियुक्त कत्रांटदाराला 1 कोटी 65 लक्ष रूपये अदा करण्यात आले आहे.प्रति घरकुल खर्च 1 लक्ष 92 हजार 453 रूपये अंदाजित करण्यात आला होता.व यासाठी नगरपालीकेने दिनांक 24/12/2009 रोजी विषेश सभा ठराव क्रमांक 65 अन्वये 1 कोटी 94 लक्ष रूपयांच्या कामाला मंजुरी प्रदान केली होती व तसा आदेष कंत्राटदार जे.बी.कन्स्ट्रक्षन नागपुर यांना 29/12/2009 रोजी देण्यात आला होता या नुसार कंत्राटदाराने 18 महीन्यांत हे बांधकाम पुर्ण करावे असे आदेषात नमूद करण्यांत आले होते.मात्र आजतागायत ही योजना पुर्ण होवू षकली नाही.वारंवार नोटीस देवूनही कंत्राटदाराने हे बांघकाम पुर्ण केले नाही अखेर या कंत्राटदारावर कारवाई करण्याचा निर्णय विद्यमान सत्ताधारी कमेटीने घेतला व त्याची सुरक्षा रक्कम रूपये 15 लक्ष जप्त करण्यात आले आहेत.या रकमेतून आगामी काळांत 25 घरकुले बांधून गोरगरीबांना द्यावीत असा ठराव नगरपालीकेने नुकताच केला आहे.त्यानुसार पुढिल प्रक्रिया सुरू असल्याचे अध्यक्ष दिलीप देषमुख यांनी सांगीतले.सद्यस्थितीत या घरकुलांसाठी 18 लाभाथ्र्यांनी प्रत्येकी 12हजार रूपयांचा भरणा नगरपालीकेच्या कार्यालयांत केला असला ती तेथे राहावयास फक्त दोनच लाभार्थी आले असल्याचे दिसून येते.याठीकाणी कुठल्याच सोयी केलेल्या नाहीत.विज,पाणी,षौचालय,रस्ते,दरवाजे खिडक्या व रंगरंगोटी आणी नाली बांधकाम करण्यात आले नसल्याने येथे लाभार्थी येवून राहण्यास तयार नाहीत हे वास्तव आहे.सध्या याठीकाणी अनेकांनी अनधिकृतरित्या या घरकुलांचा ताबा घेतला असून जनावरे बांधणे व वैरण ठेवण्यासाठी या घरकुलांचा वापर होत आहे.येथे अनेक प्रकारच्या असामाजीक तत्वांनीही बस्तान मांडले असून नगरपालीका प्रषासनाचे याकडे पुर्णतः दुर्लक्ष आहे.षासनाच्या कोटयावधी रूपयांच्या अर्थसहायानंतर नगरपालीकेची उदासीन वृत्ती यासाठी कारणीभूत असल्याची चर्चा केली जात आहे.षासनाच्या कोटयावधी रूपयांचा चुराडा झाला व कुणालाच याचा लाभ मीळाला नाही हेही वास्तव आहे.आगामी काळात या योजनेची पुर्तता कषी केली जाते याकडे रामटेकवासीयांसह लाभाथ्र्यांचेही लक्ष लागले आहे.