चंद्रपूर/प्रतिनिधी:
पोलीस स्टेशन भिसी अंतर्गत पिडीत अल्पवयीन मुलीवर जबरी संभोग करणाऱ्या आरोपीस दिनांक 29/12/2017 रोजी श्री. गौतम, सत्र न्यायाधीश, कोर्ट वरोरा डिजे-1 यांनी शिक्षा ठोठावली आहे.
पोलीस स्टेशन भिसी अतंर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र भिसी येथे आरोपी नामे गणेश भगवान खडसे वय (32) हा कर्मचारी या पदावर कार्यरत असतांना पिडीत अल्पवयीन फिर्यादीसोबत ओळख वाढविले त्यादरम्यान तिचे पुस्तक परत करण्याकरीता तिला आरोग्य केंद्रातील क्वार्टरवर बोलावुन ती अल्पवयीन आहेत हे माहीत असुन सुध्दा पिडीत अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करून तिच्यावर जबरी संभोग केला. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट व मेडीकल रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भिसी येथे अप.क्र.10/2016 कलम (354 )ड भादंवि सहकलम क, (ई)6 बाल लैेगीक प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक चहांदे यांनी पुर्ण करून आरोपी विरूध्द न्यायालयात दोशारोपपत्र सादर केले.न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक 29/12/2017 रोजी आरोपी नामे गणेश भगवान खडसे वय (३२)रा.प्राथमिक आरोग्य केंद्र भिसी यास कलम 376 भादंवि सहकलम क, (ई), 6 बाल लैगीक प्रतिबंधक कायदा मध्ये 10 वर्ष शिक्षा व 5000./-रु दंड, दंड न भरल्यास 06 महिने शिक्षा श्री. गौतम, सत्र न्यायाधीश, कोर्ट वरोरा डिजे-1 यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणात सरकार तर्फे अॅड. श्री. मिलींद देशपांडे, सरकारी अभियोक्ता, चंद्रपुर तर कोर्ट पैरवी म्हणुन पोहवा भास्कर किन्नाके पोस्टे भिसी यांनी काम पाहीले आहे.