रामटेक (तालूका प्रतिनिधी ) दिनांक २२/१२/२०१७ रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघ,राज्य कार्यकारिणी शिष्टमंडळाची मा ग्रामविकास मंत्री मा ना पंकजाताई मुंडे सो,ग्रामविकास राज्यमंत्री मा ना श्री दादासो भुसे यांचे समवेत ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्याबाबत चर्चा केली
१) ३ वर्ष कंत्राटी कालावधी सलग सेवेत समाविष्ट करणे २) ग्रामसेवक संवर्गावर इतर कोणत्याही विभागाचे काम लादण्यात येवु नये याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल ३) जुनी पेंशन योजना लागु करणे ४) डी सी पी एस मासीक कपात विवरण नियमित मिळावे ५) १५ औगष्ट,२६ जानेवारी,१ मे या सणाचे व सुट्टीचे दिवशी ग्रामसभा घेवु नयेत किंवा तारखेत बदल करावे व इतर प्रलंबित मागण्याबाबत चर्चा करण्यात आली व महाराष्ट्र राज्य ग्राम सेवक संघ राज्य कार्यकारिणी सोबत स्वतंत्र बैठक आयोजीत करण्याचे आश्वासन दिले ,,,पंतप्रधान हर घर सहज बीजली योजना कामावर ग्रामसेवक संघाने टाकलेला बहिष्कार मागे घ्यावा अशी विनंती मा मंत्री महोदयांनी केल्यामुळे सदर योजनेचे काम करण्यास राज्यातील ग्रामसेवक संवर्गाने सहकार्य करावे असे ठरले , यावेळी *महाराष्ट्र ग्राम सेवक संघाचे नागपुर विभागिय अध्यक्ष श्री विलासजी मुंढे नागपुर जिल्हाध्यक्ष भारत मेश्राम, सचिव पुनमताई पांडे, रविभाऊ रेपाडे, हरीदास जी रानडे तसेच भंडारा जिहाध्यक्ष माकाडे साहेब सचिव सुधाकर चिंदलोरे* यांनी माननीय विधानसभा मतदारसंघ तुमसरचे आमदार *श्री चरणभाऊ वाघमारे* उपस्थित होते @ राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्राम सेवक संघ