সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, December 26, 2017

अहीरांचे काय चुकले?







लोकशाहीवर विश्वास नसणाऱ्या डॉक्‍टरांनी नक्षली संघटनेत सामील व्हावं, आम्ही त्यांना गोळ्या घालू, असं वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत आलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे खरोखरच चुकले का, हा प्रश्‍न आहे. हंसराज अहिर यांनी सोमवारी चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात बनविण्यात आलेल्या अत्याधुनिक मेडिकल स्टोअरचे उद्‌घाटन केले. पण सुट्टया असल्यामुळे अनेक डॉक्‍टरांनी कार्यक्रमाला दांडी मारली. हॉस्पीटलमधील अनेक डॉक्‍टर हे ख्रिसमसच्या सुट्टीवर गेले असल्याचे सांगण्यात आल्यावर हंसराज अहिर चांगलेच संतापले. देशाचे गृह राज्यमंत्री स्वत: उपस्थित असताना डॉक्‍टरांची दांडी, हा गंभीर विषय आहे. यावरून लक्षात घ्या की, हे डॉक्‍टर खरोखरच सुटीच्या दिवशी रुग्णसेवा देत असतील काय? नाराजी व्यक्त करताना अहीरांची जीभ घसरली खरी. पण, जनतेने निवडून दिलेला खासदार, केंद्रीय राज्यमंत्रीपदावर असलेला नेता कार्यक्रमाला असतानाही डॉक्‍टर रजेवर कसे जाऊ शकतात? हा प्रश्‍नच आहे.





त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसेल तर त्यांनी खुशाल नक्षलवादी संघटनेत भरती व्हावे, आम्ही त्यांना गोळ्या घालू, असे ते बोलले आणि हा वाद पुढे आला. सामान्य रूग्णालय परिसरातील सदर उद्घाटन कार्यक्रम असताना प्रमुख शासकीय वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित राहतात, हा प्रकार दुर्दैवी वाटल्याने त्यांच्या बाबतीतच विधान केले, अन्य डॉक्‍टरांबाबतीत ते नव्हते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता अनुपस्थित असल्याचे कळले. त्यामुळे त्यांनाही उद्देशुन हे वक्तव्य नव्हते. ज्या कार्यक्रमास स्थानिक खासदार तथा केंद्रीय मंत्री, आमदार, महानगराच्या महापौर, उपमहापौर, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्‍टर मंडळी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असताना, त्यांच्याच रूग्णालय परिसरात कार्यक्रम होत असताना मात्र जिल्हा शल्य चिकित्सकांसारखे प्रमुख जबाबदार शासकीय अधिकारी याप्रसंगी अनुपस्थित राहून मार्गदर्शन करणे टाळतात. प्रधानमंत्र्यांच्या गोरगरीबांसाठी असलेल्या अशा महत्वाकांक्षी योजनेकडे पाठ फिरवितात याचे शल्य वाटल्याने लोकशाहीवर विश्वास नसलेल्या अशा जबाबदार शासकीय वैद्यकीय अधिका-याबाबत असे वक्तव्य करणे भाग पडल्याचे स्पष्टीकरण त्यांनी आता दिले आहे.
डॉक्‍टरांचा सदैव सन्मान करणारा मी व्यक्ती आहे. माझे वडीलही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होते. लोकसभा क्षेत्रामध्ये एम्स, आयएमए व स्थानिक डॉक्‍टरांच्या सहकार्यातुन अनेक स्वास्थ्य विषयक कार्यक्रम घेतले आहेत. अनेक शिबिरांचे आयोजन डॉक्‍टरांच्या सहकार्यातूनच यशस्वी केले आहे. अशा रूग्णसेवेतील समर्पित डॉक्‍टरांबाबत अनुदार वक्तव्य कधीही केले नाही त्यांचा सदैव आदरच केला, असेही अहिरांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.