चंद्रपूर/ प्रतिनिधी:
मनपाने आज वडगाव नगर स्थित बापट नगर येथे विजीत सेल्स सर्व्हिस अँड प्रायव्हेट लिमिटेड या दुकानाच्या मनपाचे कर थकविल्या प्रकरणी या दुकानाला सील केले आहे. देवेन भाई शहा असे या कर थकविणाऱ्या दुकान मालकाचे नाव आहे. या दुकानदाराने मनपाचे १ लाख ९७ हजार ३६३ रुपयांचे कर थकविले होते. या दुकानदाराला मनपाने २ दिवस आधी नोटीस दिली होती मात्र कराचा भरणा न केल्याने मनपाने या दुकानाला टाळे ठोकले आहे. मनपा हद्दीतील शासकीय कार्यालये व खासगी प्रतिष्ठानाकडे कोट्यवधी रूपयांचा कर थकीत आहे. थकबाकीदारांना मनपाने नोटीस बजावले. मात्र, तरीही कराचा भरणा केला नाही. त्यामुळे मनपाने जप्तीची धडक मोहीम हाती घेतली. मनपा क्षेत्रातील मालमत्ता धारकांने शासकीय कराचा वेळेवर भरणा करून मनपाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.