नागपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची राज्य कार्यकारिणी सभा अध्यापक भवन नागपूर येथे राज्याचे अध्यक्ष प्रसाद पाटील कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यात 23 ऑक्टोबर 2017 च्या अन्यायकारक वरिष्ठ श्रेणीच्या शासननिर्णयातील अट क्र.4 रद्द करण्यासाठी आंदोलन करूनही शासन दाद देत नसल्याने न्यायालयात याचिका टाकण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
सभेला आर जी भानारकर, राज्य प्रमुख सल्लागार, विजय भोगेकर राज्यसरचिटनीस, प्रमिला माने राज्य उपाध्यक्ष, यादवकांत ढवळे, कल्याण राऊत उपाध्यक्ष, नारायण कांबळे प्रमुख संघटक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सभेत वरील विषयासह खालील ठराव पारित करण्यात आले. जुनी पेन्शन हक्क संघटना द्वारे आयोजित मोर्चाला सक्रिय सहभाग व पाठिंबा जाहीर करण्यात आला, शालेय पोषण आहार अंतर्गत धान्यादी पुरवठा बाबत आंदोलनाची व्याप्ती वाढवून तिसरा टप्पा जाहीर करण्यात आला याअंतर्गत शिक्षण संचालक कार्यालयावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे, MSCIT मुदतवाढ मार्च 2018 पर्यंत देण्याबाबत लढा देणे, शालार्थ शासननिर्णयाप्रमाणे सर्व सोयी सुविधा पुरविणे, सातवा वेतन आयोग बाबत प्रत्येक लढ्यात सहभागी होणे, ऑनलाइन कामावर बहिष्कार चा लढा जिल्हास्तरावर अधिक तीव्र करणे, सर्व विषय शिक्षकांना वेतनश्रेणी देणे, शिक्षकांचा जॉब चार्ट निश्चित करणे, प्रत्येक उच्च प्राथमिक शाळेला मुख्याध्यापक पद मंजूर करणे, सर्व विद्यार्थ्यांना गणवेश पुरवणे, विद्यार्थी उपस्थिती भत्त्यात वाढ करणे, शिक्षकांचा जॉब चार्ट निश्चित करणे, शिक्षण सेवकांना 3 वेतनवाढी मंजूर करणे याबाबत स्वतंत्र लढा उभा करणे तसेच कमी पटाच्या शाळा बंद करणे बाबत राज्यभर तीव्र विरोध करणे, गरज पडल्यास न्यायालायीन लढा उभारणे. शिक्षक बदली शासननिर्णयात सुधारणा शासनास सुचवणे या विषयावर ठराव मंजूर करण्यात आले. सभेत राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या प्रतिनिधींनीनी आपले विचार व्यक्त केले, शासन दिवसेंदिवस नवनवीन शासन निर्णय काढून शिक्षकांवर शारीरिक व मानसिक दडपण निर्माण करत आहे त्याविरुद्ध लोकशाही मार्गाने लढा देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
सभेला हरीराम येळणे गोंदिया, हरीश ससनकर, दीपक वरेकर, प्रतिभा उदापुरे चंद्रपूर, एस.के.पाटील कोल्हापूर, ए.टी. कराड, हबीब शेख, बाळासाहेब पौळ बीड, जी.एस.मंगनाळे नांदेड, ई.एल.ढेंगे, रमेश पारधीकर, सुरेश लांजेवार, ई र पठाण भंडारा, आनंद शेंडे यवतमाळ, विजय सुरनार परभणी, सुनील जाधव अहमदनगर, लीलाधर सोनवणे, विनोद गवारले नागपूर, राजकुमार जाधव वर्धा यासह राज्यभरातून सर्व जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सभेचे आयोजन नागपूर पुरोगामी जिल्हा शाखेचे पदाधिकारी लीलाधर सोनवणे, विनोद गवारले, आनंद चांदेकर, प्रशांत राशीनकर, मंगेश चुके, निलेश निचत, विजय जोगेकर पद्माकर ननोरे, पांडुरंग गवघरे, नंदकिशोर लुचे, आनंद चांदेकर, अनिल जाधव यांनी केले.