कोळसा खाण प्रभावित गावात विकास कामे करणे ही बाब सामाजिक दायीत्वाचा अविभाज्य भाग असून अशा वेकोलि प्रभाव क्षेत्रातील गावांमध्ये रस्ते, पेयजल, स्वास्थ्य सुविधा, शिक्षण व भुमिहिनांना रोजगार व गावाचा समतोल विकास करण्याची वेकोलि प्रबंधनाची जबाबदारीच नव्हे तर तो कर्तव्याचा भाग असून साखरी या वेकोलि प्रभावित गावात तलावाचे खोलीकरण, सौदर्यीकरण तसेच नळ योजनेचा लोकार्पण या बाबींची पूर्तता करण्याचा वेकोलि प्रबंधनाचे कार्य निश्चितच स्तुत्य असून अशाच कार्यातून त्यांनी सर्व प्रभावित गावांना न्याय देण्यासाठी भरघोस सीएसआर निधी उपलब्ध करावा अशी भुमिका केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी साखरी येथे आयोजित भुमिपुजन व लोकार्पण सोहळा प्रसंगी व्यक्त केली.
वेकोलि बल्लारपूर क्षेत्रांतर्गत राजुरा तालुक्यातील साखरी या गावात तलावाचे खोलीकरण व सौदर्यीकरण कामाचे भुमिपुजन व येथील नळ योजनेचे लोकार्पण ना. हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते दि. 17 डिसेंबर रोजी पार पडले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्यास आ.अॅड. संजय धोटे, राजुरा विधानसभा प्रमुख खुशाल बोंडे, बल्लारपूर वेकोलि क्षेत्राचे क्षेत्रिय महाप्रबंधक श्री. सिंग, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राहुल सराफ, जिल्हा किसान आघाडीचे सरचिटणीस राजू घरोटे, जि.प. सदस्य सुनिल उरकुडे, सरपंच भाऊजी कोडापे, काशीनाथ गोरे, मनोहर पोडे, मोतीराम गोरे, धर्मराव उरकुडे, सुरेश पोडे, किसन कावडे, रामचंद्र कावडे, संजय गोरे, सौ. सुरेखा गोरे, हरिदास बोबडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर व उपस्थित मान्यवर अतिथींच्या शुभहस्ते विधीवत भुमीपुजन पार पडले. या प्रसंगी केलेल्या मार्गदर्शनात ना. हंसराज अहीर यांनी वेकोलि प्रकल्पग्रस्तांना मिळणाÚया मोबदल्यात एक छदामही कमी होवू देणार नाही असा पुनरूच्चार केला. या जिल्हयात खनिज व जलसंपदेचे भांडार आहे. या संपदेचा लोकांना पेयजल व सिंचन तसेच रोजगारासाठी वापर होईल या दृष्टीकोणातून वेकोलि प्रबंधनाने नियोजन करावे असे सांगत प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, भाजीपाला व अन्य व्यवसायातुन नागरिकांनी प्रगतीचा मार्ग शोधावा असे आवाहन करतांनाच सुशिक्षितांनी आपल्या ज्ञानाचा पुरेपूर वापर करून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेत आपले भविष्य उज्वल करावे व शिक्षणाची कास धरून ग्रामीण क्षेत्रातील विद्याथ्र्यांनी परीश्रमपूर्वक विविध क्षेत्रामध्ये स्वतःचा उत्कर्ष साधाण्याचे आवाहन केले. वेकोलिने सामाजिक दायीत्व निधीतून तलाव खोलीकरण व सौदर्यीकरण कामासाठी 19 लक्ष रूपये व ग्रामीण पाणीपुरवठा नळ योजनेकरिता 40 लक्ष रूपए उपलब्ध करून दिले.
या प्रसंगी आ. संजय धोटे यांनी वेकोलि प्रबंधनाने साखरी या गावात विकासाच्या पर्वास प्रारंभ करून आपल्या सामाजिक दायीत्वाला न्याय देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल समाधान व्यक्त करून प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक, शैक्षणिक, व्यावसायीक प्रगतीसाठी वेकोलिने योगदान द्यावे असे आवाहन केले. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीतुन अब्जावधी रूपयांच्या निधीची भर राष्ट्रीय उत्पन्नात घातली जाते त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसित गावात विकासाला गवसणी घालणारे कार्य वेकोलिने पार पाडावे अशी भावना त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.
क्षेत्रिय महाप्रबंधक श्री. सिंग यांनी वेकोलि प्रबंधनाद्वारे विकास विषयक आढावा आपल्या प्रास्ताविक भाषणातून घेतला. कार्यक्रमात बिरसा मुंडा इंडेन गॅस एजन्सी मार्फत 15 लाभार्थी महिलांना प्रधानमंत्राी उज्ज्वला योजने अंतर्गत ना. हंसराज अहीर, आ. संजय धोटे व गॅस एजन्सीचे प्रबंधक वाघुजी गेडाम यांचे शुभहस्ते गॅस गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री संतोष उरकुडे, प्रविण खांडारकर, सुदर्शन बोबडे, अॅड. प्रशांत घरोटे, मिथून काटवले, चंद्रशेखर कावळे, संदीप कावळे, मिलन करदोडे आदींनी परीश्रम घेतले.