चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र व तेलगंणा या दोन राज्याचे सिमेवरील बंजारा व आदिवासी समाजबांधव यांचेत भौगोलीक सिमा व आरक्षणावरुन तेलगंणा राज्यात वाद सुरु आहे. चंद्रपुर जिल्हयाला लागुन तेलगंणा राज्याची सिमा आहे.
चंद्रपुर जिल्हयातील सिमावर्तीत भागात पोलीस स्टेशन जिवती अंतर्गत बंजारा समाजबांधव यांची वस्ती आहे. भौगोलीक सिमा व आरक्षणावरुन तेलगंणा राज्यात सुरु असलेल्या वादाचे पडसाद चंद्रपुर जिल्हयातील सिमावर्ती भागात वसलेल्या काही गांवामध्ये सुध्दा उमटत असल्याचे दिसुन येताच कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता पोलीस स्टेशन जिवती अतंर्गत पेालीस दलाने तात्काळ दखल घेवुन सिमावर्तीत भागात वसलेल्या सेवानगर, प्रेमनगर, महारजगुडा, कामतगुडा परमडोलीतांडा या गांवामध्ये परीस्थीतीवर लक्ष ठेवण्याकरीता तसेच नागरीकांचे जिवीतास व मालमत्तेस हानी पोहचणार नाही दृष्टीकोनातून पोलीस अधिकारी व कर्मचारी यंत्रणेचा चोख बंदोबस्त नेमला आहे.
चंद्रपूर पोलीस दलातर्फे असे आवाहन करण्यात येत आहे की, सबंधित भागातील नागरीकांनी कोणत्याही प्रकारच्या माध्यमातुन काहीएक आधार नसताना येणाऱ्या अफवांवर विस्वास न ठेवता प्रशासनास सहकार्य करावे. तसेच कोणीही समाजकंटक अशाप्रकारे अफवा पसरवुन दोन समाजमामध्ये तेढ निर्माण होईल
असे वक्तव्य किंवा काही आक्षेपार्य कृत्य करीत असेल तर त्याबाबत तात्काळ पोलीसांना माहीती देवुन पोलीस
प्रषासनाचे पाठीशी उभे रहावे.