अनिल कोल्हे मुख्य प्रषासक,किषोर रहांगडाले उपमुख्य प्रषासक
रामटेक तालुका प्रतिनिधी-रामटेक तालुका कृशि उत्पन्न बाजार समीतीचे नवे प्रषासकीय मंडळ राज्य सरकारकडून नियुक्त करण्यांत आले असून आमदार डी.एम.रेड्डी यांचे निकटवर्तीय अनिल कोल्हे यांना या प्रषासक मंडळाचे मुख्य प्रषासक व बाजार समीतीचे माजी प्रषासक किषोर रहांगडाले यांना उपमुख्यप्रषासक नेमण्यात आले आहे.बाजार समीतीच्या विद्यमान प्रषासक रामटेकच्या सहायक निबंधक भारती काटुळे यांचेकडून नवे प्रषासक मंडळ लवकरच कार्यभार स्वीकारतील.नव्या प्रषासक मंडळात एकूण 17 जनांचा समावेष आहे.यासंबधिचे अधिकृत आदेष नागपुर जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था सतिश भोसले यांनी दिनांक 18 डिसेंबर 2017 रोजी जारी केले आहेत.रामटेक-मौदा बाजार समीतीचे नुकतेच विभाजन करण्यांत आले होते.रामटेक व मौदा अषा दोन स्वतंत्र बाजार समीत्या निर्माण करण्यात आल्या त्यामुळे तत्कालीन वेळी अस्तित्वात असलेले अषासकीय प्रषासक मंडळ बरखास्त करण्यात येवून रामटेक व मौदा या दोन्ही तालुक्यांचे प्रषासकपदावर तेथील सहायक निबंधक यांना नेमण्यात आले होते दिनांक 14 नोव्हेंबर 2017 पासून श्रीमती भारती काटुळे या बाजार समीतीच्या प्रषासकपदावर आहेत.बाजार समीतीच्या विभाजनानंतर या बाजार समीत्यांवर अषासकीय प्रषासक मंडळ नियुक्त करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे.दिनांक 06 आॅक्टोबर 2017 पासून आगामी दोन वर्शांच्या कालावधीसाठी हे अषासकीय प्रषासक मंडळ नियुक्त करण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,नागपुर यांनी आदेषात म्हटले आहे.
सदर नियुक्ती ही महाराश्ट्र कृशि उत्पन्न पणन(विकास व विनियमन)अधिनियम 1963 चे कलम 13(2)अन्वये करण्यात आली असून याच अधिनियमातील कलम 14(3)अन्वये नुसार कालावधी निष्चित करण्यांत आला आहे.नव्या अषासकीय प्रषासक मंडळात अनिल लक्ष्मणराव कोल्हे व किषोर राधेलाल रहांगडाले या अनुक्रमे मुख्यप्रषासक व उपमुख्यप्रषासकांसह दिगांबर बाबुराव वैद्य,महेष पुरणलाल बम्हनोटे,खेलन रामप्रसाद पारखी,सुंदरलाल पे्रमलाल ताकोद,कृश्णा नत्थू मस्के,संजय चुन्नीलाल गुप्ता,बाबुलाल परषुराम वरखडे,जि.प.सदस्या दुर्गा हरिश्चंद्र सरीयाम,प्रकाष फेकन मोहारे,सुधिर जनार्दन धुळे,चरणसिंग षितलप्रसाद यादव,कृश्णा गजानन भाल,मोतीराम जंगलु तरारे,के.कृश्णा सुब्बा रेड्डी व चंद्रभान ताराचंद धोटे यांचा समावेष आहे.हे प्रषासक मंडळ लवकरच पदारूढ होणार असल्याचे समजते.