সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, December 21, 2017

पेंचच्या कालव्यात चौघे बुडाले

नागपूर : पेंच प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या मार्गावरून येत असलेली भरधाव मोटरसायकल स्लीप झाली. त्यात मोटरसायकलवरील तिघेही कालव्यात पडले व वाहून जाऊ लागले. मागाहून येणाऱ्या  दुसऱ्या  दुचाकीवरील तरुण त्या तिघांना वाचविण्यासाठी लगेच कालव्यात उतरला असता, त्या तिघांसोबत तोही वाहून गेला. या घटनेत चौघेही बुडाले. यापैकी दोघींचे मृतदेह सापडले असून, दोघांचा शोध सुरू आहे. ही घटना पारशिवनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माहुली - मनसर दरम्यानच्या कालव्याच्या मार्गावर गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
कमलेश लालचंद जैन (कवाड) (२७), त्यांची पत्नी अंजली कमलेश जैन (कवाड) (२४), त्यांची बहीण प्रियंका राजू जैन (कवाड)कवाड (२३) तिघेही रा. महाजनवाडी, बोंद्रे ले आऊट, मनसर, ता. रामटेक व कमलेश जैन यांचा मावसभाऊ आशिष नरेंद्र जैन (गोलछा) (२३, रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) अशी बुडालेल्यांची नावे आहेत. आशिष हा कमलेश जैन यांच्याकडे पाहुणा म्हणून आल्याने या सर्वांसोबत पायल राजू जैन (कवाड) (२०, रा. महाजन वाडी, बोंद्रे ले आऊट, मनसर, ता. रामटेक) हे पेंच जलाशय परिसरात फिरायला जात होते. कमलेश, अंजली व प्रियंका एका मोटरसायकलवर तर आशिष व पायल स्कूटीवर होते.
दरम्यान, कालव्याच्या पुलाजवळ कमलेशची मोटरसायकल स्लीप झाली आणि तिघेही कालव्यात पडले. आशिष स्कूटी थांबवून त्या तिघांना वाचविण्यासाठी लगेच कालव्यात उतरला. मात्र, पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने चौघेही वाहून जाऊ लागले. त्यातच पायलने आरडाओरड केली. त्यामुळे जवळच असलेल्या हुकूमचंद बिरो यांनी शिवारातील नागरिकांना मदतीला बोलावले. नागरिकांनी अंजली व प्रियंका यांचे मृतदेह घटनास्थळापासून अर्धा कि.मी. अंतरावर असलेल्या पटगोवारी नदीजवळ काठीने कालव्याच्या कडेला लावले. मात्र, कमलेश व आशिष वाहून गेले. माहिती मिळताच पारशिवनी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी कमलेश व आशिषला शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु, अंधारामुळे त्यांना शोधण्यात अडचणी येत होत्या. या प्रकरणी पारशिवनी पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.