चंद्रपूर/प्रतिनिधी:
संत शिरोमणी श्री जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरात लावण्यात आलेले फलक मनपा प्रशासनाने काढले यावर आक्षेप घेण्यात आला असून मनपा प्रशासनाविरोधात कायदेशीर रित्या कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक आकाश साखरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातून आयोजन करण्यात आले होते समाजातील नागरिकांना याबाबत माहिती मिळावी म्हणून शहरात काही निवडक ठिकाणी फलक लावण्यात आले होते हे फलक मनपाच्या वतीने काढण्यात आले यावर तेली समाजाच्या वतीने तीव्र आक्षेप नोंदवण्यात आला काही दिवसांपूर्वी शहरात भाजपचे पदाधिकारी आमदार, खासदार, मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले सर्वोच्च न्यायालयाचे सर्व नियम सर्रास पणे धाब्यावर बसवीत हा प्रकार झाला.
मात्र मनपा प्रशासनाने कारवाई करण्याऐवजी याकडे सपेशल डोळेझाक करण्यात आली हा अन्याय फक्त तेली समाजावरच का ?असा सवालही यावेळी करण्यात आला त्याच प्रमाणे स्वच्छ शहर सुंदर शहर या नावाची पोस्टरबाजी सध्या शहरात सुरू आहे विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता नियमांची पायमल्ली करत है ब्यानर लावण्यात आले नियमांचे पालन करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहेत सर्व सहकार्य करीत असताना नेमक्या तेली समाजावरच का?असा सवाल ही यावेळी उपस्थित करण्यात आला. यावेळी पत्रपरिषदेत माजी नगरसेवक आकाश साखरकर यांच्यासह अनूप बेले सोनू आगड़े ,गोलू तेलमासरे, आकाश चौबे,बबलू झोरे यांची उपस्थिती होती.