पारशिवणी तालुका प्रतिनिधी ::
शिक्षका पेक्षा समाजात कुणीच वरचढ नाही कारण एक शिक्षक हा समाजातील एक पिढी घडवितो,तेव्हा शासकिय स्तरावर या शिक्षण क्षेत्राकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असताना देखील त्या कडे कानाडोळा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.ज्याला कारणीभूत म्हणजे शिक्षन क्षेत्राचे सपाट्याने होत चाललेले खाजगीकरन.देशातील नावाजलेल्या प्रतिष्ठानांच्या हातात शिक्षन क्षेत्राची दोरी गेलेली असल्या मुळेच एक चांगला समाज व देशाला नावलौकिक मिळवून देणारे देशहिताचे कर्णधार घडविणाऱ्या शिक्षण क्षेत्राची सध्या दुरावस्था झालेली असल्याची खंत शिक्षक आमदार ना.गो.गाणार यांनी वेध प्रतिष्ठान तर्फे आयोजित शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रमा दरम्यान व्यक्त केली.
विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन सभागृह सीताबर्डी,नागपूर येथे वेध प्रतिष्ठान तर्फे आयोजित शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रकाश एदलाबादकर हे होते.तर प्रमुख अतिथी मध्ये शिक्षक आमदार नागो गाणार,दिपेंद्र लोखंडे शिक्षणाधिकारी जी.प.नागपूर यांची प्रमुख उपस्थिती होती.दरम्यान वेध प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी प्रमाणे पाच शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.यावेळी योगेश माणिकराव वासाडे राहणार टेकाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोर्डा,रामटेक पंचायत समिती येथे शिक्षक म्हणून कर्त्याव्यावर असून वेध प्रतिष्ठान तर्फे साने गुरुजी शिक्षक गौरव पुरस्काराने सपत्नीक गौरविण्यात आले तर वैशाली गेडाम यांना शिक्षनतज्ञ जे.पी.नाईक शिक्षक गौरव,हसीना शेख यांना साने गुरुजी शिक्षक गौरव पुरस्कार,मीना खाडे यांना शिक्षन वेध कार्यकर्ता पुरस्कर्तेना शॉल श्रीफळ व सम्मान चिन्ह प्रदान करून शिक्षकांचा गौरव करण्यात आला.