चंद्रपूर/प्रतिनिधी:
पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी अंतर्गत पिडीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस दिनांक 29/12/2017 रोजी श्रीमती. मोनिका आरलॅन्ड, जिल्हा सत्र न्यायाधीश -1 यांनी शिक्षा ठोठावली आहे.
पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी अतंर्गत मौजा खेडमक्ता येथे पिडीत अल्पवयीन फिर्यादी ही आपले घरी खोलीत अभ्यास करीत असता आरोपी नामे हिरामन विठोबा गुरफुडे वय 54 वर्षे रा. खेडमक्ता ता.ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर पिडीत असलेल्या खोलीत जावुन ‘ तुझी आई कुठे गेली म्हणुन विचारले, तेव्हा तिने आईबाबा शेतात गेले असे म्हणाली असता आरोपीने अश्लील शब्दात शीवीगाळ करून पिडीत फिर्यादीचा विनयभंग केला. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे अप.क्र. 124/2014 कलम 354, 448 भादंवि सहकलम 8 बाल लैेगीक प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहा. पोलीस निरीक्षक सोनकुसरे यांनी पुर्ण करून आरोपी विरूध्द न्यायालयात दोशारोपपत्र सादर केले.
न्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक 29/12/2017 रोजी आरोपी नामे हिरामन विठोबा गुरफुडे वय 54 वर्षे रा.खेडमक्ता ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर यास कलम 354 (अ)भादंवि मध्ये 3 वर्षे सश्रम कारावास शिक्षा व 10,000/-रु दंड, दंड न भरल्यास 2 महीने शिक्षा, कलम 448 भादंवि मध्ये 1 वर्षे सश्रम कारावास शिक्षा व 1000/-रु दंड, दंड न भरल्यास 1 महीना शिक्षा, सहकलम 8 बाल लैगीक प्रतिबंधाक कायदा मध्ये 5 वर्षे शिक्षा व 20,000./-रु दंड, दंड न भरल्यास 03 महिने शिक्षा, श्रीमती. मोनिका आरलॅन्ड जिल्हा सत्र न्यायाधीश -1 यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणात सरकार तर्फे अॅड. श्री. एस.आर. डेगावार, सरकारी अभियोक्ता, चंद्रपुर तर कोर्ट पैरवी म्हणुन पोहवा राजु सबळ पोस्टे ब्रम्हपुरी यांनी काम पाहीले आहे.