সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, December 23, 2017

मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासहीत 3 जवान शहीद


पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय सैन्यातील तीन जवानांसहीत एक अधिकारी शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. शहीद झालेले जवान 120 इन्फंट्री ब्रिगेडमधील आहेत. दरम्यान, पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्रातील मेजर प्रफुल्ल मोहरकर शहीद झाले आहेत. मोहरकर हे मूळचे भंडारा जिल्ह्यातील होते. त्यांचे वय 32 वर्ष एवढे होते. त्यांच्या पश्चात पत्नी अबोली व मोठा आप्त परिवार आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील केरी सेकटरमध्ये मेजर मोहरकर यांच्या नेतृत्वात नियंत्रण रेषेवर पेट्रोलिंग सुरू असताना पाकिस्ताननं शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार केला. त्यात मेजर मोहरकर यांच्यासह जवान कुलदीप सिंग, जवान परगत सिंग आणि जवान कुलदीप सिंग शहीद झाले. 


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.