अकोला/प्रतिनिधी:
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे सभापत पुंडलिकराव अरबट यांचा स्वीय सहायक श्रीकांत महादेवराव ठाकरे (५१) याला गुरुवारी दुपारी एका तक्रारकर्त्याकडून ५००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी)अधिकाºयांनी रंगेहाथ अटक केली. जिल्हा परिषद परिसरात दुपारच्या सुमारास सापळा लावून लाचखोर श्रीकांत ठाकरेच्या मुसक्या आवळण्यात आल्याच्या कारवाईने एकच खळबळ उडाली.