সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, December 31, 2017

सर्वांगिण विकासाकरिता भावी पिढी सक्षम करा - जितेंद्र पापळकर


पिपर्डा गावात स्वच्छता महोत्सव साजरा
चंद्रपुर(प्रतिनिधी)दिनांक- 31/12/2017 गावाचा ख-या अर्थाने विकास करायचा असेल तर, गावातील लहान मुल उद्याचे भावी नागरिक होणार आहे. यांना सर्वांगाने सक्षम केल्यास गावांचा सर्वांगाने विकास करता येतो . असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कोरपना तालुक्यातील पिपर्डा गावात आयोजित स्वच्छता महोत्सव कार्यक्रमात व्यक्त केले.
स्वच्छता महोत्सवाचे प्रास्ताविक कोरपना पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांनी केले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲड. संजय धोटे,कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर,प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रविंद्र मोहिते ,सामाजिक कार्यकर्ता सय्यद आबिद अली प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर पुढे बोलतांना म्हणाले की, मुलांचा विकास करावयाचा असेल तर स्वच्छतेच्या सवयीसह कुपोषणमुक्त ग्राम होणे गरजेचे आहे. यासोबतच स्पर्धेच्या युगात गावातील तरुण समोर येण्या साठी तरुणांनी वाचणाची सवय लावली पाहिजे. वाईट व्यसना पासुन दुर राहिले पाहिजे. उल्वल जीवन घडविण्यासाठी  लहान पणा पासुनच चांगल्या सवयीचा स्विकार केला पाहिजे. पिपर्डा गावातील शाश्वत स्वच्छता ,गुडमार्निंग पथक सह गावात राबविलेल्या सर्व उपक्रमांचे मनापासुन कौतुक करतो .असे मत व्यक्त केले. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार ॲड. संजय धोटे यांनी जीवनमान उंचावण्या करीता सर्वांनी स्वच्छता राखणे गरजेचे आहे. हे सर्व गावांनी ठरविले तेव्हाच घडुन येते. अशाप्रकारचा आदर्श पिपर्डा ग्रामस्थांनी दाखवुन दिला आहे. गावाची ताकद सर्वात मोठी असुन, गावक-यांनी एकत्र येवुन केलेला प्रत्येक संकल्प हा पुर्णत्वास जातो असे मत व्यक्त केले. जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) रविंद्र मोहिते यांनी एकत्र येवुन गावाला आदर्शवत करणारे सर्व ग्रामस्थ गावविकासाची प्रमुख भुमिका पार पाडत असुन, सकारात्मक दृष्टीने सर्वांनी विचार केल्यामुळेच आज गावात शाश्वत स्वच्छता निर्माण झाली आहे. असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने नायब तहसिलदार मडावी, कृषी अधिकारी देवनाडे, स्वच्छ भारत मिशनचे  माहिती शिक्षण संवाद तज्ञ कृष्णकांत खानझोडे, पिपर्डा ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रभान मडावी, धानोली ग्रामपंचायतचे सरपंच विजय रणदिवे, विस्तार अधिकारी जिवन प्रधाण, प्रविण मस्के, खुशाल राठोड, कोरपना नगरपंचायतचे नगरसेवक सोयल अली, रमेश पाटिल मालेकर तथा गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..
कार्यक्रमात गावात शाश्वत स्वच्छता राखणारे जेष्ठ नागरिकांचा व गुडमोर्णिंग पथक उपक्रम राबविणा-या तरुणांचा भव्य  सत्कार करण्यात आला. शादीखाना सभागृह, प्रधानमंत्री आवास योजनेचे भुमिपुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन पिपर्डा गावचे सामाजिक कार्यकर्ता सय्यद आबिद अली यांनी केले.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.