रामटेक तालुका प्रतिनिधी:
रामटेक पंचायत समीती येथे कार्यरत विस्तार अधिकारी
(पंचायत)चंद्रशेखर माधवराव पाटील यांना अखेर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बलकवडे यांनी घरचा रस्ता दाखविला. दिनांक 15 डिसेंबर 2017 रोजी जारी केलेल्या आदेशन्वये पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.महीला तक्रार निवारण समीतीच्या चौकशी अहवालात त्यांचेवरील आरोप हे खरे असल्याचे प्रथमदर्शीनी स्पस्ट झाल्याने पाटील यांचे निलंबन करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यांत आले आहे. रामटेक पंचायत समीती येथे सुमारे तीन वर्षापासुन विस्तार अधिकारी (पंचायत)या पदावर कार्यरत असलेले चंद्रशेखर माधवराव पाटील हे त्यांच्या अधिनस्त महीला कर्मचारी यांना विविध प्रकारे त्रास देत होते.
महीलांशी लगटकरणे,त्यांना विनाकारण मानसिक त्रास देणे अशी अनेक प्रकरणे पाटील यांचेविरूद्ध होती.काही महीलांनी त्यांची याबाबत तक्रारही दाखल केली होती मात्र आपल्या प्रभावाने पाटील उन्मत्त झाले होते व आपले कोण काय बिघडवतो या तोऱ्यात ते वागत असत मात्र महादुलाच्या ग्रामसेविका यांनी त्यांची तक्रार थेट जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेकडे तक्रार करण्याची हिंमत केली आणी प्रकरण तापले.वर्तमानपत्रांमधमनही पाटील यांना धारेवर धरण्यांत आले दरम्यान पाटील यांची पोलीसांत तक्रार करण्यांत आली त्यांचेवर भादवीच्या 354 व आयट्रोसिटी अंतर्गत गुन्हा नोदविण्यात आला. पाटलांनी मात्र प्रकरण अंगाावर येताच पोबारा केला अद्यापही पाटील पोलीसांना सापडले नाहीत ते फरार असल्याचे कळते.
नागपुरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपुर्व जामीनासाठीचा अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी आता उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठात अर्ज केल्याचे कळते. निलंबन काळात पाटील यांना भिवापुर पंचायत समीती हे मुख्यालय ठरविण्यात आले असून दररोज त्यांनी हजेरीपटावर स्वाक्षरी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.निलंबन काळांत त्यांना निर्वाह भत्ता देण्याचे आदेशही याद्वारे देण्यात आले आहेत.पाटील यांना निलंबित करण्यासाठी ग्रामसेवक संघटना व पीडीत महीलांचा मोठा दबाव जि.प.प्रशासनावर होता हे विषेश.पाटील यांना पोलीस कधी अटक करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले